दहावी बोर्ड परीक्षेत जीवन प्रगती विद्यालयाचे घवघवीत यश.
नांदुरघाट : शालात प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून,यामध्ये केज तालुक्यातील जीवन प्रगती शिक्षण संस्था नांदुरघाट संचलित जीवन प्रगती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100% टक्के लागला असून, छत्रपती संभाजीनगर एसएससी बोर्ड परीक्षेत *प्रथम क्रमांक जाधव तनुजा रामहरी 100%, व दुसरा क्रमांक कु.कटके दीक्षा परमेश्वर 99.60 तर, तिसरा क्रमांक म्हेत्रे प्राजक्ता पुरुषोत्तम 98.60,चौथा क्रमांक आंधळकर श्रावणी महादेव 98.00%, पाचवा क्रमांक जाधव सिद्धी बाळासाहेब 97.20,ढाकणे पंकजा गोविंद,97.20. सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन जीवन प्रगती शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सावित्रीबाई(अक्का) मोराळे, संस्थेचे आधारस्तंभ मा. राजेशजी मोराळे साहेब,सचिव मा.सौ.माधुरीताई मोराळे साहेब मुख्याध्यापक विलास ढाकणे सर यांनी केले.जीवन प्रगती शिक्षण संस्था ग्रामीण भागामध्ये ज्ञानदानाचे कार्य करत असून संस्थेला यश परंपरेचा एक वारसाच लाभलेला आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच इतर उपक्रमामध्येही विद्यार्थ्यांना सहभागी करून त्यांना गुणवंत बनवण्याचा प्रयत्न असतो.संस्थेच्या स्थापनेपासून विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक आहे. राजेशजी मोराळे यांचे मार्गदर्शक व सहकार्य विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सतत प्रेरणादायी असते.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.