बीड जिल्ह्यात आवतरला “धर्मभास्कर”. बीड जिल्ह्याची जलजीवन योजना कोटय़वधींच्या भ्रष्टबेंदाडात. भ्रष्टाचाराचा चा मास्टरमाइंड भेंडेकर निलंबित!!
सीईओ पाठक यांची धडाकेबाज कारवाई.
बीड : सन १९९० मध्ये धुळे जि.प.मधील भास्कर वाघ उर्फ “धर्मभास्कर” याच्या टिम ने धुळ्याची झेडपी पुर्णपणे चाबलून खात भ्रष्टाचाराची बेवड निर्माण केली होती. धर्मभास्कर प्रकरणालाही लाजवणाराही भयानक प्रकार बीड जि.प.च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जलजीवन या महत्वाकांक्षी योजनेत उघड झाला असून, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्यासोबत कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार करणारा आणि जलजीवन योजनेची वाट लावण्यात माहीर असणारा मास्टरमाइंड ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ सहाय्यक ए .पी. भेंडेकर यांच्यावर नूतन सीईओ अविनाश पाठक यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे .अविनाश पाठक यांच्या कारवाई मुळे भ्रष्टाचाराच्या गटरीत बुडविण्यात आलेली जलजीवन योजना वाचण्याची शक्यता निर्माण झाल्याच्या असंख्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.बीड जिल्ह्यामध्ये बीड झेड.पी च्या पाणीपुरवठा विभागामार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील जलजीवन मिशन योजनेचा तत्कालीन सी.ई. ओ. अजित पवार आणि पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अक्षरशः बट्ट्याबोळ केला आहे. जवळपास चौदाशे कोटी रुपये खर्च करून बाराशे पेक्षा अधिक गावात कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची जलजीवन योजना या माध्यमातून पुर्ण करुन जिल्ह्य़ातील नागरिकाना स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा करण्याचा या योजनेचा उद्देश होता. मात्र अजित पवार आणि त्यांच्या बगल बच्चांनी मर्जीतील गुत्तेदारांची टोळी तयार करून या योजने मध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला असल्याचे उघड झाले आहे. अक्षरश: वाटेल त्या पद्धतीने इस्टिमेट तयार करून शासनाच्या पैशाचा गैरव्यवहार,अपहार व भ्रष्टाचार केला आहे. या गैरव्यवहारात नामदेव उबाळे अजित पवार आणि कनिष्ठ सहाय्यक ए.पी. भेंडेकर या त्रिकुटाने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचे उघड होत आहे.दरम्यान, सी.ई ओ. अजित पवार यांची बदली झाल्यानंतर गेल्या महिन्याभरापासून नामदेव उबाळे गायब असून भेंडेकर यांच्यावर नूतन सीईओ अविनाश पाठक यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. पाठक यांनी जॉईन झाल्यापासून जलजीवन मिशनमध्ये सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बीड जिल्ह्य़ातली महत्वकांक्षी जलजीवन योजना वाचवण्याची जबाबदारी सीईओ अविनाश पाठक यांनी घेतल्यानंतर त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी काही गुत्तेदारांनी बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्याकडे तक्रारही केली होती. दरम्यान पाठक यांनी भेंडेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करून जलजीवन मध्ये भ्रष्ट कारभार करणाऱ्यांना धोक्याचा इशारा दिला असून, केवळ रेकॉर्डवर कामे दाखवून योजनेचा बट्ट्याबोळ वाजवणाऱ्या गुत्तेदारांचेही धाबे दणाणले आहेत.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.