Breaking Newsक्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शालार्थ आयडी घोटाळ्यात नागपूर शिक्षण विभागाचे वेतन पथक अधीक्षक निलेश वाघमारे यांना अटक. 580 बोगस शिक्षकांच्या नावावर पगार वितरण; SIT तपासात खळबळजनक धक्का!

पाठलाग न्युज/प्रतिनिधी :

शालार्थ आयडी घोटाळ्यात नागपूर शिक्षण विभागाचे वेतन पथक अधीक्षक निलेश वाघमारे यांना अटक.

580 बोगस शिक्षकांच्या नावावर पगार वितरण; SIT तपासात खळबळजनक धक्का!

नागपूर – राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात काल गुरुवारी आणखी एक मोठी कारवाई झाली आहे. नागपूर शिक्षण विभागाच्या वेतन पथक व भविष्य निधी पथक विभागाचे अधीक्षक निलेश वाघमारे यांना विशेष तपास पथकाने (SIT) अटक केली आहे.

त्यांच्यावर सुमारे 580 बनावट शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने पगार मंजूर करून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचा गंभीर आरोप आहे. मागील पार्श्वभूमी या प्रकरणाची सन 2019 पासून सुरू असलेल्या बोगस नियुक्त्या आणि बनावट शालार्थ आयडी निर्मितीच्या तपासातून झाली. अनेक जिल्ह्यांतील शिक्षण विभागातील अधिकारी, शाळा व्यवस्थापन आणि मध्यस्थ यांच्या संगनमतातून बनावट अनुभव प्रमाणपत्रे, फर्जी नियुक्ती आदेश, आणि खोटे सेवा नोंदी तयार करून शालार्थ पोर्टलवर नावे नोंदवण्यात आली. त्यानंतर या बनावट कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात पगार जारी करण्यात आला. एप्रिल 2025 मध्ये या घोटाळ्याचा मोठा भाग उघड झाल्यानंतर निलेश वाघमारे यांना प्रथम निलंबित करण्यात आले होते. त्याचवेळी विभागीय उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह इतर अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली होती. गुरुवारी सकाळी नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. तपासादरम्यान बनावट पगार मंजुरीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे, पगार रजिस्टर आणि संगणकीय डेटा जप्त करण्यात आला. या पुराव्यांच्या आधारे SIT ने वाघमारे यांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केल्यावर न्ययालयाने त्यानां जामीन नाकारल्या नन्तर त्यांना IPC कलम 420 (फसवणूक), 465 (खोटी कागदपत्रे तयार करणे), 468, 471 आणि 120(B) (कट रचणे) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. SIT चा प्राथमिक अंदाज आहे की, हा घोटाळा राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पसरलेला असून, त्यामागे शिक्षण विभागातील काही उच्चपदस्थ अधिकारी आणि शाळा व्यवस्थापनांचा थेट सहभाग असू शकतो. पुढील काही दिवसांत अजून काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.निलेश वाघमारे याच्या अटकेनंतर नागपूर शिक्षण विभागासह संपूर्ण विदर्भातील प्रशासनात खळबळ माजली आहे. आधीच या प्रकरणाच्या तपासाला विरोध म्हणून अनेक अधिकारी अनिश्चितकालीन सुट्टीवर गेले होते. त्यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक योजनांवर आणि निधी वितरणावर परिणाम होऊ लागला आहे. नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश वाघमारे यांच्या अटकेमुळे शिक्षण विभागात पुन्हा खळबळ उडाली आहे. वाघमारे हे सुमारे चार महिन्यांपासून फरार होते. वाघमारे यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाकडून त्यांचा जामीन अर्ज रद्द करण्यात आला असून, त्यानंतर गुरुवारी दुपारी सायबर पोलिसांनी त्यांना धरमपेठेतील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली.निलेश वाघमारे हे भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक म्हणून कार्यरत होते. नागपूर विभागात 2019 ते 2025 या दरम्यान अनेक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बोगस शालार्थ आयडी तयार करून त्याद्वारे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करण्यात आल्याची बाब उघड झाली होती. विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीने ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर कनिष्ठ प्रशासन अधिकारी रवींद्र पाटील यांनी सायबर पोलिसांना या संदर्भात तक्रार दिली होती. तक्रारीत अनेक शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचे बोगस शालार्थ आयडी तयार करून शासनाच्या निधीचे नुकसान केल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश वाघमारे फरार झाले होते. तक्रारीच्या नंतर काही दिवसातच उपसंचालक उल्हास नरड आणि शिक्षक पराग बुगडे यांनाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी चौकशी नन्तर निलेश वाघमारे यांना निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाची चौकशी केवळ नागपूर विभागापुरती मर्यादित न राहता राज्यातील सर्व विभागाची याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी पावसाळी अधिवेशनात करण्यात आली. त्यास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उत्तर देताना एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. पुणे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन झाली आहे. त्यातच अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघातर्फे चौकशी झाल्याशिवाय शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक करू नये, या मागणीसाठी काम बंद आंदोलन करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हे काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले. त्यातच आता निलेश वाघमारे यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणातील आरोपींची सुटका नाही, हे स्पष्ट झाले आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये