Breaking Newsक्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केजमधील महालक्ष्मी कला केंद्र प्रकरणात धक्कादायक निकाल : पोक्सो प्रकरणातील सर्व 27 आरोपी निर्दोष!

पाठलाग न्यूज / क्राइम प्रतिनिधी :

केजमधील महालक्ष्मी कला केंद्र प्रकरणात धक्कादायक निकाल : पोक्सो प्रकरणातील सर्व 27 आरोपी निर्दोष!

महालक्ष्मी कला केंद्रावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अशाही प्रकारचे राजकारण करण्यात आले होते.

केज: बीड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात 2023 मध्ये खळबळ उणवणाऱ्या केज शहरातील( उमरी तालुका केज ) येथील महालक्ष्मी कला केंद्र प्रकरणात तब्बल 27 आरोपींना केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता दिली आहे. विशेष पोक्सो खाटल्यात केज जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.बी. भाजीपाले यांनी हा निकाल दिला. या खटल्यात आरोपींच्या वतीने वकील अजित लोमटे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. दरम्यान पोक्सो कायद्यान्वये दाखल झालेला हा खटला, स्थानिक पातळीवर व राज्यभरात चर्चेचा विषय ठरला होता. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, ७ जुलै २०२३ रोजी पहाटे महालक्ष्मी कला केंद्रात परवानगीच्या वेळेपेक्षा उशिरापर्यंत नृत्य कार्यक्रम सुरू होता. या ठिकाणी अल्पवयीन चार मुलींना नृत्यासाठी आणून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. तसेच कलाकेंद्र चालक सत्वशीला बाबासाहेब आंधारे आणि उबठा गटाचे शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्यासह इतरांवर वेश्याव्यवसायाला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी कलम 188,109,114,290,34,370(4)(5) 370 (अ), 373, 376 (फ) (आय) भा.दं.वि सह कलम 4,6,17,18,21 बालकाचे लैंगिक अत्याचार अधिनियम, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,6,8,9, बालकांची काळजी व संरक्षण अधिनीयम 2015 चे कलम 75,79, तसेच अ.जा.ज.अ. प्र.का कलम 3(2) (V), मुं.दा. का. कलम 65 (ई) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. पिडीत मुली या अल्पवयीन आणि दलित समाजातील असल्याचे तपासात नमूद झाले होते. या प्रकरणी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी तपास करून विविध कलमान्वये २७ जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकारतर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले; मात्र आरोप सिद्ध न झाल्याने आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून सर्व आरोपी निर्दोष मुक्त करण्यात आले. यातील लहू अंधारे, शीतल अंधारे, संगीता काळे आणि संतोष बडगे हे चार आरोपी निकालापर्यंत कारागृहात होते, तर इतर जामिनावर होते. या प्रकरणात बचाव पक्षाचे प्रमुख वकील अॅड. अजित लोमटे यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपींना न्याय मिळवून दिला. त्यांना अॅड. संस्कार शिनगारे, अॅड. चंद्रकांत जाधव, अॅड. ओमप्रकाश धोत्रे आणि अॅड. अभिजित सोळंके यांनी सहकार्य केले. या प्रकरणाकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागून होते. घटना काय होती? महालक्ष्मी कला केंद्रावर पोलीस उपअधीक्षक पंकज कुमावत यांच्या पोलीस पथकाने छापा टाकत, वेश्याव्यवसाय चालवल्याचा आणि अल्पवयीन मुलींचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. पोक्सो, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपपत्रात तब्बल 27 जण आरोपी म्हणून नावांमध्ये होते, ज्यात केंद्राचे संचालक, व्यवस्थापक, नर्तिका, कर्मचारी आणि अन्य संबंधितांचा समावेश होता.
& चौकशीतील वादंग&
या प्रकरणातील तपास सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरला. कथित पीडितांच्या जबाबांमध्ये विसंगती, वैद्यकीय अहवालातील कमतरता, तसेच साक्षीदारांनी न्यायालयात दिलेल्या व बदललेल्या जबाबामुळे खटल्याला वेगळे वळण मिळाले. अनेक साक्षीदारांनी पोलिसांच्या दबावाखाली जबाब दिल्याचा आरोप केला होता.& न्यायालयाचा निकाल& न्यायालयाने सर्व पुरावे व साक्षींचे पुनर्परीक्षण करताना स्पष्ट नमूद केले की, “अभियोक्त्यांकडून सादर करण्यात आलेले पुरावे आरोप सिद्ध करण्यास अपुरे आहेत. कोणत्याही आरोपीविरुद्ध ठोस, विश्वासार्ह पुरावे सादर करण्यात आले नाहीत.” त्यामुळे सर्व 27 आरोपींना निर्दोष मुक्तता देण्यात आली. &स्थानिक प्रतिक्रिया&या निर्णयाने केज शहरात चांगलीच खळबळ माजली आहे. काहींनी याला “न्यायाचा विजय” म्हटले, तर काहींनी हा निकाल तपासातील त्रुटींचा परिणाम असल्याची प्रतिक्रिया दिली. काही सामाजिक संस्थांनी या प्रकरणातील मूळ आरोपी खरेच निर्दोष होते का, यावर स्वतंत्र चौकशीची मागणी व्हावी अशी आशा व्यक्त केली आहे .

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये