क्राईम न्युजमहाराष्ट्र

सेवानिवृत्तीनंतरच्या अंशराशीकरणाची रक्कम अदा करण्यासाठी चार हजाराची लाच स्वीकारताना वरिष्ठ सहाय्यकासह सेवानिवृत्त सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

पाठलाग न्युज/प्रतिनिधी:

सेवानिवृत्तीनंतरच्या अंशराशीकरणाची रक्कम अदा करण्यासाठी चार हजाराची लाच स्वीकारताना वरिष्ठ सहाय्यकासह सेवानिवृत्त सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

धाराशिव : लाचखोरीचा हैदोस आणि सरकारी कामातील अडवणूक विकोपाला गेली असून, जिकडे तिकडे गैरव्यवहाराचे थैमान माजलेले असतांनाच, अंशराशीकरण व उपदानाची रक्कम खात्यावर जमा करून देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका वरिष्ठ सहाय्यकासह सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले आहे. याबाबत ची सविस्तर माहीती अशी की,तक्रारदार यांची आई ह्या ज़िल्हा परिषद शाळेतून शिपाई या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या आहेत. त्यांना शासनाकडून अंशराशीकरण व उपदानाचे १५ लाख २९ हजार ८०४ रुपये मिळणार असल्याने तक्रारदार २६ सप्टेंबर रोजी धाराशिव पंचायत समितीतील लेखाविभागत गेले होते. त्यावेळी तक्रारदारास लेखा विभागातील वरिष्ठ सहाय्यक मिलिंद कांबळे व सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हनुमंत पवार या दोघांनी अंशराशीकरण व उपदानाची रक्कम आईच्या खात्यावर जमा करुन देण्यासाठी ४ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचतप प्रतिबंधक विभागाने २८ सप्टेंबर रोजी पंचायत समिती परिसरात सापळा लावला. तक्रारदार पंचायत समिती परिसरात गेले असता, नमूद दोघांनी त्यांच्याकडून ४ हजार रुपये स्वीकारले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नमूद दोघास ताब्यात घेऊन आनंदनगर पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद दिली. त्यावरुन दोघांविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे.ही कारवाई धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, सचिन शेवाळे, सिद्धेश्वर तावस्कर, अविनाश आचार्य, नागेश शेरकर यांच्या पथकाने केली.
शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये