Breaking Newsताज्या घडामोडी

केज तहसील कार्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

केज तहसील कार्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

केज/ प्रतिनिधी : केज तहसील कार्यालयात आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती  बाळासाहेब ओव्हाळ यांच्या प्रमुख सहभागाने   मोठ्या उत्साहात व सन्मानाने साजरी करण्यात आली. ना.तहसीलदार यांच्या दालनात सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन वाघमारे, (मराठवाडा संघटक आरपीआय ), विकास मस्के (जिल्हा कार्याध्यक्ष ) अंबादास तुपारे (केज तालुका सचिव), विकास आरकडे (तालुका अध्यक्ष आरपीआय ), राहुल बचुटे, आनंद ओव्हाळ, अंगद शिनगारे, भीमराव हजारे, तुपारे सर नामदेव गायकवाड ऊसतोड मुकादम व पत्रकार शिवदास मुंडे तसेच तहसील मधील कर्मचारी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आनंदात व जोश पूर्ण वातावरणात पार पाडला.

कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या वेळी उपस्थित सर्वांनी सामूहिकरीत्या त्यांच्या योगदानाचा गौरव करत ‘जय अण्णाभाऊ !’च्या घोषणा दिल्या. त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत काही कार्यकर्त्यांनी आपले विचार चर्चेतून व्यक्त केले . सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, विचार व संघर्षशील वाटचाल याचा थोडक्यात आढावा कार्यक्रमात चर्चा व संवाद रूपाने घेण्यात आला.

दलित व कामगार वर्गासाठी त्यांनी केलेले कार्य आजही मार्गदर्शक ठरत असल्याचे मत काही कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले. तहसीलदारांच्या अनुपस्थितीतही कर्मचाऱ्यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे या उपक्रमात युवक, महिला व कार्यालयीन कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये