पंकजाताईसाठी “समता परिषद” बीड लोकसभेच्या “कुरुक्षेत्रावर”सुभाष राऊतांचे तमाम ओबीसींना पंकजाताईंना प्रचंड मतंनी विजयी करण्याचे आवाहन!!
बीड : विनाकारण “जातीय चक्रव्यूहात” अडकवण्यात येत असलेल्या बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या पाठिशी तमाम ओबीसींनी उभे राहण्याची आवश्यकता असून, तसे आदेश ओबीसी नेते मा.छगन भुजबळ साहेबांनी दिले असल्याचे आवाहन समता परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष अॅड.सुभाषराऊत यांनी केलेआहे.
कुठल्याही परिस्थितीत बहुजनांचा नेता स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी पंकजाताई मुंडे यांच्यासाठी प्रत्येकाने आपल्या गावात जास्तीत जास्त मतदान कसे होईल, पंकजाताई यांना मताधिक्य कसे देता येईल हे पहाण्याची आज गरज निर्माण झाली आहे, असे अॅड. सुभाष राऊत यांनी म्हटले आहे . या निवडणुकीत ओबीसींच्या हितासाठी पंकजाताई मुंडे यांना निवडुण आणण्याचे आदेश मा. छगनराव भुजबळ साहेब यांनी दिले आहेत. त्यामुळे समता परिषद या निवडणुकीत सक्रियपणे काम करीत आहे. गावागावातील समता सैनिक आणि तमाम ओबीसींनी तसा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी या निवडणुकीत खंबीरपणे महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या पाठिशी उभे राहावे असे आवाहन समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अँड. सुभाष राऊत यांनी केले आहे. बीड लोकसभेच्या निवडणूकीचा प्रचार आणि मतदार संघातील निवडणूक आता निर्णायक वळणावर उभी आहे. या निवडणुकीत ओबीसींच्या हितासाठी पंकजाताई मुंडे निवडून आल्या पाहिजेत अशी भूमिका समता परिषदेचे संस्थापक आध्यक्ष मा. छगनराव भुजबळ साहेब यांनी घेतलेला असल्याची माहीती अॅड.सुभाष राऊत यांनी दिली.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.