केज तहसील चा लाचखोर तहसीलदार अभिजित जगतापवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा प्रस्तावित तर,एजन्ट कोतवाल माने २० हजार स्वीकारतांना लाचलुचपतच्या जाळ्यात!
केज : सरकार लाखो रुपये महिना पगार देत असले तरी,प्रशासनातल्या अधिकारी व शासकीय कर्मचाऱ्यांची लाचखोरी विकोपाला गेलेली असतांनाच बीड जिल्ह्य़ातील केज तहसीलच्या पुरवठा विभागांतर्गत कार्यरत एका भ्रष्टाचारी दुकानदारावरची कारवाई क्लिन करण्यासाठी कोतवालामार्फत ४०हाजाराची मागणी करणारा केज तहसील च्या तहसीलदारावर कोतवालासह गुन्हा प्रस्तावित झाला असून, सम्धित कोतवाल तडजोडीचे २० हजार स्विकारताना रंगे हात पकडला आहे तर तहसीलदार फरार झाला आहे. या बाबत सविस्तर वृत्तांत असा की,केज तालुक्यातील एका रेशन दुकानावर कारवाई न करण्यासाठी ४० हजाराच्या डिमांड पैकी रु.२० हजार रूपयांची लाच स्वीकारतांना केजमधील केजच्या तहसीलदारांचा एजन्ट तथा कोतवाल एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे तर, केज चा तहसीलदार अभिजित जगताप (पाटील) हा मुख्य आरोपी असून तो आपल्या सरकारी क्वार्टर मधून फरार झाला आहे. ही कारवाई धाराशिव येथील लाचलुचपत पथकाने शुक्रवारी रात्री १० वाजता केली. बीड एसीबीने लाचलुचपत बाबत मोठ्या कारवाया करूनही बीड जिल्ह्यातील लाचखोरीचे सत्र सूरूच आहे. अभिजीत जगताप (पाटील)हा केज तहसील चा तहसीलदार आहे तर, मच्छिंद्र माने हा कोतवाल असून, तहसीलदार जगताप याच्यासाठी वसूलीचे काम करतो. केज तालुक्यातीलच एका रेशन दुकानदारावर भ्रष्टाचारा बाबत कारवाई प्रस्तावित होती. सदरची कारवाई थांबवण्यासाठी तहसीलदार जगताप पाटील याने ४० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीत २० हजार ठरवून हीच २० हजाराची लाच कोतवाल माने याने स्विकारली. परंतू, तहसीलदार जगताप हा आपल्या सरकारी क्वार्टर मधून फरार झाला आहे. धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने या आठवड्यातील ही दुसरी कारवाई बीड जिल्ह्यातंच केली आहे. केज तहसील च्या तहसीलदारावरची ही कारवाई संभाजीनगर विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप अटोळे ,अप्पर पोलीस अधीक्षक मुकूंद आघाव,यांचे मार्गदर्शनाखाली धाराशिव लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपले सहकारी पोलीस आमलदार दिनकर उगलमुगले,मधुकर जाधव,सचिन शेवाळे ,नागेश शेरकर चालक- दत्ता कोरडे यांनी पार पाडली. केज चा तहसीलदारंच लाचखोर निघाल्याने या कारवाई ने बीड च्या पुरवठा विभागात खळबळ उडाली आहे.कारवाई मधील तहसीलदार हा नवनियुक्त प्रशिक्षणार्थी असल्याने त्याने आपल्या प्रशिक्षण कालावधीत “लाचखोरी”चेच प्रशिक्षण चालवले होते; ,अशी चर्चा आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.