श्याम कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान व कला शाखेचा बारावीचा निकाल शंभर टक्के.
केज: केज तालुक्यातील दहिफळ (बडमाऊली) श्याम कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी विज्ञान व कला शाखा परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून,निकालात मुलींचाच वर चष्मा दिसून आला आहे . याबाबतची सविस्तर माहिती अशी की, श्याम कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना ग्रामीण भागाचे शिक्षण महर्षी, कर्मयोगी शामरावजी गदळे गुरुजी यांनी केली तेव्हापासून ते आजतायगत या महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच राहीलाआहे.संस्थेचे सचिव श्री शरद शामराव गदळे यांचे निरनिराळ्या मीटिंगमधून शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्राध्यापकांचे अध्यापन आणि विद्यार्थ्यांची जिद्द आणि मेहनत या सर्वांचा परिपाक आणि परिणाम म्हणजे बारावीचा लागलेला गंभर टक्के निकाल होय. यावर्षी सर्वच परीक्षार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. या निकालात मुलींनी बाजी मारली यामध्ये विज्ञान शाखेची कुमारी शिंदे सृष्टी शरद ९३ टक्के गुण घेऊन प्रथम आलेली आहे.कुमारी नागरगोजे श्वेता रामदास ९२.६७% गुण घेऊन द्वितीय आली आहे, कुमारी आंधळे पायल ज्ञानोबा ९१ .३३% गुण घेऊन तुतीय आली.तसेच कला शाखेत कुमारी जगताप अर्चना ८२ टक्के गुण घेऊन प्रथम आली, कुमार वाघमारे सागर रवींद्र ८१ टक्के गुण घेऊन द्वितीय आला व ढाकणे सुनील नामदेव याने ७९ टक्के गुण घेऊन तृतीय येण्याचा मान पटकावला आहे. या व सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव श्री शरद शामराव गदळे, अध्यक्ष डॉ. शशिकांत शामराव दहिफळकर, कोषाध्यक्ष डॉक्टर शालिनीताई कराड, प्राचार्या सौ जयश्री शरद गदळे, उपप्राचार्य राजेश गंधगे, शाम विद्यालय व शाम क.महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व पालक यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत असल्याची माहिती श्री तात्यासाहेब डोईफोडे सर यांनी दिली आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.