येवता: केज तालुक्यातील येवता येथे लाईट उप केंद्र असून, या सबस्टेशन मधील यंत्र सामुग्री पैकी काही खराब झालेली असल्याने लाईट उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्री अहो रात्री काम करावे लागते उप केंद्रातील एबीसी स्विच खराब झाल्याने संबंधित कार्यरत कर्मचाऱ्यास विद्युत पुरवठा चालू बंद करताना स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करावे लागते यामुळे त्या कर्मचाऱ्यास यंत्रात बिघाड झाल्याने जोडणे व तोडणे ही प्रक्रिया पूर्ण करूण लाईट चालु व बंद करन्यासाठी आर्धा ते पाऊन तास वेळ दररोज घालवत काम करावे लागते लाईट पाळी बदल करण्या करिता प्रत्येक वेळी तास अर्धा – पाऊन तास लाईट चालू होण्यास वेळ लागतो सदर यंत्र सामुग्री सुरळीत करण्याची शेतकरी वर्गाकडून सातत्याने मागणी होत आहे. @ आमच्या प्रतिनिधीने शेतकरी यांच्याशी संपर्क साधला असता- दररोज लाईट आधा ते पाऊन तासाने उशीरा येते. शेतकरी-युवराज यंका चौरे.
@ आमच्या प्रतिनिधीने येवता उप केंद्रातील कर्मचारी ऑपरेटर यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी इनकमर बांधणे,अँसीलेटर वोपन होत नाही,इ बी सी स्वीच खराब झालेने सिंगल-थ्रीफेज लाईट करण्यास वेळ लागतो,चारही फिररला रिले नाहीत त्यामुळे लोढ कळत नाही. ऑपरेटर-अनिकेत शिंदे.
@ आमच्या प्रतिनिधीने सब इंजिनियर मस्साजोग यांच्याशी संपर्क साधला असता आम्हाला खुप अडचणी आहेत,एजेंशीला सांगतले आहे. सहाय्यक अभियंता मस्साजोग, उमेज भोयर. @ आमच्या प्रतिनिधीने उप अभियंता महावितरण कार्यालय, केज यांच्याशी संपर्क केला असता कार्यकारी अभियंता यांच्याशी पत्र व्यवहार केला आहे.आपण पण संपर्क करावा. उप अभियंता, महावितरण,केज-एम.जी.सय्यद
@ आमच्या प्रतिनिधीने अंबाजोगाई कार्यालयास संपर्क केला असता टि वाय यांना विचारतो. संदीप चाटे कार्यकारी अभियंत,महावितरण, अंबाजोगाई”
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.