ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

लोहा मतदार संघात हाकेंच्या गाडीवर दगडफेक.

पाटला न्यूज / प्रतिनिधी :

लोहा मतदार संघात हाकेंच्या गाडीवर दगडफेक.

लोहा: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवून मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बाचोटी – लोहा मतदारसंघातील जनहित पक्षाचे उमेदवार चंद्रसेन पाटील त्यांच्या प्रचारासाठी लक्ष्मण हाके हे कार्यकर्तेसह आले होते. प्रचार सभा संपवून परत जात असताना त्याच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.

यावेळी असंख्य मराठा आंदोलक रस्त्यावर जमले होते. त्यांनी हाके यांची गाडी अडवून ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी आंदोलक देखील आक्रमक झाले. त्यांनी देखील घोषणाबाजी केली. त्यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले.

घटनेदर्म्यान हके याचेशी सपर्क केला तेव्हा ते म्हणाले की प्रचार सभा झाल्यानंतर आम्ही परत जाताना १०० ते १५० तरुण आले. त्यांनी चेहरे झाकले होते. त्यांच्या हातात लाठ्या होत्या आणि त्यांनी आमच्यावर भ्याड हल्ला केला. हे तरुण गाडीवर चढले आणि त्यांनी एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. या तरुणांनी जरांगे पाटलांच्या घोषणा देखील दिल्याचे हाके म्हणाले. जेव्हा आम्ही गाडी थोडी पुढे घेतली तेव्हा त्यांनी मागून माझ्या गाडीवर दगडफेक केली ज्यात गाडीच्या काचा फुटल्या. आमच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. आमच्यावर भ्याड लोकांनी हल्ला केला आहे. तोंड बांधून काय हल्ला करता? असा सवाल विचारत हाके यांनी हल्ला करायचा असेल तर समोरा समोर या असे आव्हान दिले.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये