ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

खासदार बजरंग सोनवणे यांची पत्रकारांसमोर दिलगिरी!

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी:

खासदार बजरंग सोनवणे यांची पत्रकारांसमोर दिलगिरी!

केज/प्रतिनिधी: बीड जिल्ह्यात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त एकटेच निवडून आलेले  आ. संदीप क्षीरसागर यांच्या नागरी सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त करताना अनावधानाने आपल्या बाबत निवडणुकीत हेराफेरीचा  संशय निर्माण करणारी बातमी कुणालातरी संशय आला म्हणून बातमी केल्याचे आपण म्हटले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपण केज मतदार संघात जीवाचे रान करत प्रचार केला व प्रचार यंत्रणा सांभाळली, असे असताना माझ्या भूमिकेवर संशय निर्माण करणारी बातमी छापण्यात आली होती. सदरची  बातमी माझ्या सारख्या कार्यकर्त्यास मनस्ताप देणारी ठरली. यातून सदरील पत्रकार मित्राकडे तक्रार वजा बोलताना संशय आपणास का?घरच्या कुणाला आला असे म्हटले गेले. यावेळी आपण उल्लेख केलेल्या शब्दानी कुणाच्या भावना दुखाव्यात अशी आपली अजिबात भावना किंवा अपेक्षा नव्हती. मात्र याने माझ्या राजकीय प्रवासात माझ्या सोबत कायम राहिलेल्या माझ्या अनेक सहकारी मित्रांचे मन दुखावले. अशा सर्व माझ्या मित्रांच्या बाबतीत मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या पत्रकार मित्राना दिलगिरी सोबतच हे आवाहन करतो की, आपण माझे टिकाकार सल्लागार आहात. मी टिकेचे आणी सल्याचे नेहमी स्वागत करत आलोय. या पुढेही स्वागतच करणार आहे मात्र, आपल्यातील काही ठराविक मित्र  ठरवून बदनामी, संशय निर्माण करत असतील तर,आपण पत्रकार म्हणून अश्या मित्रांना योग्य मार्गदर्शन करावे. मला विश्वास आहे आज ज्या प्रमाणे माझ्या कडे आपण व्यक्त झालात असे च भविष्यात चुकीच्या बातमीला बंधन घालाल. बाकी मी माझ्या वक्तव्याने कुणाचे मन दुखावले बाबत दिलगिरी व्यक्त करत आहे. आपला विश्वासू खा. बजरंग सोनवणे. असे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये