बीड जिल्हाधिकारी पदाचा डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्वीकारला पदभार.
बीड : बीड जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ (भा. प्र. से ) यांनी आज स्वीकारला. जिल्हाधिकारी अविनाश पाठक (भा. प्र. से ) प्रशिक्षणासाठी जात आहेत. त्यामुळे बीड जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार त्यांनी जालना जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे सोपविला. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ 27 डिसेंबरपर्यंत अभ्यागतांसाठी मंगळवारी आणि गुरुवारी उपलब्ध राहणार आहेत.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.