माजलगाव चे भाजपाचे माजी आमदार आर. टी. देशमुख( जिजा) यांचे अपघाती निधन.
केज: माजलगावचे भाजपाचे माजी आमदार तथा दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेब यांचे त्या काळचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या आर.टी.देशमुख यांचे रस्ता अपघातात निधन झाले असून, हा अपघात लातूर जिल्ह्यातील लातूर-औसा रस्त्यावरील बेलकुंडी गावाजवळ आज दुपारी झाला असल्याची माहिती मिळाली आहे.त्यांना लातूरच्या सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, परंतु डॉक्टरांनी आटोकाट प्रयत्न करूनही त्यांची प्रकृती उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. माजलगावचे माजी आमदार आर.टी.देशमुख आपल्या खाजगी वाहनाने प्रवास करीत होते. सोमवारी दुपारी त्यांच्या वाहनाचा गंभीर अपघात झाला. यात आर.टी. देशमुख जखमी झाले. त्यांना तातडीने लातूर येथील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.आर.टी.देशमुख यांच्याकडे बीड जिल्ह्यातील राजकारणाचा एक सुसंस्कृत चेहरा म्हणून पाहिले जाते. सुरुवातीला जिल्हापरिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केले होते. नंतर ते माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले. भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी ते एक होते. दीर्घकाळ भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पहिले. आर. टी. देशमुख यांच्या अपघाताची माहिती कळतच राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून लातूरकडे प्रयाण केले असल्याचे समजते. बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी आपल्या फेसबुकवर देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पाठलाग परिवारातर्फे आर टी देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.