‘सासू-सुन’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विजयासाठी कंबर कसून निवडणूक मैदानात.
मुंबई: जनतेला हाच भाऊ पुन्हा हवाय. मोठ्या मताधिक्याने एकनाथ शिंदे पुन्हा आमदार व नंतर मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदे कायम आपल्या कामातून उत्तर देतात. ते विरोधकांच्या टीकेला कधीच प्रत्युत्तर देत नाहीत, त्यामुळे ते बहुमताने निवडून येतील”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई शिंदे म्हणाल्या.राज्यातील विधानसभा निवडणुकीला दिवसेंदिवस रंगत येत असून, बहुतांश उमेदवारी अर्ज भरून झाले आहेत. प्रचारालाही वेग आला आहे. २९ ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अनेकांनी २८ ऑक्टोबर रोजीच अर्ज भरले. यावेळी अनेकांनी मोठं शक्तीप्रदर्शनही केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाण्यात शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या पत्नी लताताई शिंदे आणि सूनबाईही प्रचाराला हजर होत्या. एकमेकींचं कौतुक करत त्यांनी एकनाथ शिंदे यांना निवडून आणण्याचं आवाहन मतदार जनतेला केलं. माध्यमा समोर दोघी बोलत होत्या. “जनतेला हाच भाऊ पुन्हा हवाय. मोठ्या मताधिक्याने एकनाथ शिंदे पुन्हा आमदार व व मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदे कायम कामातून उत्तर देतात. त्यामुळे ते बहुमताने निवडून येतील”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, “नवऱ्याच्या पाठी महिलेने खंबीर उभं राहावं, आपण मेहनत केली तर त्यांना ताकद मिळेल.” लाडक्या बहिणीची दिवाळी आता खुशीत, आनंदात आणि जोरदार राहणार असल्याचंही त्या आवर्जुन म्हणाल्या.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.