संपादक,पत्रकारावरील अदखलपात्र गुन्हा मागे घ्या! मागणी : जिल्हाभर पत्रकार संघटनांनी निषेध नोंदवत दिले निवेदन.
बीड / प्रतिनिधी: केज मतदार संघाच्या भाजप आ.नमिता मुंदडा यांच्या विरोधात समाज माध्यमातून तीव्र नाराजी असल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर दैनिक पुण्यभूमीने त्या संदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे माझे नेते आ.नमिता मुंदडा, त्यांचे पती अक्षय मुंदडा, सासरे नंदकिशोर मुंदडा यांची बदनामी झाली आहे. या तथ्यहीन कारणातून मुंदडा कार्यकर्ते सुनिल देविदास घोळवे यांनी केज पोलीस ठाण्यात दैनिक पुण्यभूमीचे संपादक बाळासाहेब मस्के आणि केज प्रतिनिधी रोहन गलांडे यांच्या विरोधात अदखलपात्र गून्हा दाखल केला आहे. त्या गुन्ह्याचा जिल्ह्यात पत्रकार संघटनांकडुन निषेध नोंदवत निवेदने देवून गुन्हा मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाणे पत्रकार शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची देखील भेट घेवून या प्रकरणात सविस्तर चर्चा केली.यावेळी संपादक कामरान शेख, समीर काझी, सुनिल डोंगरे, देवेंद्र ढाका, संग्राम धन्वे, आनंद वीर, विक्रांत वीर,विनोद शिंदे,यांच्यासह आदी उपस्थित होते.पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात पत्रकार संघटनांनी म्हंटले आहे की, बातमी पडताळून न पाहता केज पोलीस ठाण्याचे निरीक्षक थेट अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेतात कसे, हा प्रश्न आहे. सत्ताधारी वर्गाला जनता प्रश्न विचारत असेल आणि माध्यमातून हि बाब परखडपणे मांडली जात असेल तर यात कशी काय बदनामी होवू शकते. आ. नमिता मुंदडा यांनी पोलीस यंत्रणेवर दबाव टाकून त्यांच्या कार्यकर्त्यास पुढे करत हा खोटा गुन्हा नोंदविला आहे. ही बाब प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे. त्यामुळे संपादक बाळासाहेब मस्के आणि केज प्रतिनिधी रोहन गलांडे यांच्यावर दाखल केलेला हा खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा.अशी मागणी करण्यात आली आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.