बीड विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनमाजी आमदार अँड. उषाताई दराडेनिवडणूक रिंगणात..?
बीड /प्रतिनिधी: बीड विधानसभा निवडणुकीसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्या अँड. उषाताई दराडे यांनी पक्षाकडे अधिकृत तिकीट मागितले असून, नुकत्याच झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीमध्ये अँड उषाताई दराडे यांनी पक्षप्रमुख शरदचंद्र पवार साहेब यांच्यासमोर आपली बाजू कणखरपणे मांडली असल्यामुळे आता बीड विधानसभा उमेदवारी बाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये रंगत वाढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवार यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी खऱ्या अर्थाने सर्वप्रथम ठोस पावले उचलली. त्यांनी शासन, प्रशासन, उद्योग व्यवसाय विविध क्षेत्रांमध्ये महिलांना देखील सन्मानाची संधी आणि वागणूक दिली. त्यामुळेच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मौजे टाकळी सारख्या ग्रामीण खेड्यात जन्मलेल्या आणि मार्क्सवादी काँग्रेस पक्षातून जडणघडण झालेली असताना काँग्रेस पक्षातून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांना प्रवेश देऊन शरदचंद्र पवार साहेबांनी सन्मानाची पदे दिली. अँड उषाताई दराडे या उच्चशिक्षित बीएससी एलएलबी विधीज्ञ असून त्यांनी जिल्हा परिषद सदस्य ते जिल्हा परिषद चे अध्यक्ष पद देखील यशस्वीपणे सांभाळले होते. त्यांच्यातील नेतृत्व गुण आणि कार्यतत्परता लक्षात घेता पवार साहेबांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पद देऊन राज्यांमध्ये त्यांचे नेतृत्व उभे केले.एवढेच नव्हे तर त्यांना आमदारांच्या निवडीतून विधान परिषदेवर आमदार म्हणून सदस्य देखील केले. आपल्या विधान परिषद सदस्याच्या काळात ताईंनी उत्कृष्ट वक्ता म्हणून राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा पुरस्कार देखील संसदेत पटकावला होता. त्यांनी मराठवाडा विकास आंदोलनात सहभाग घेतला. मराठवाडा नामविस्तार लढ्यामध्ये करावास भोगला.आणीबाणी मध्ये त्यांना अटक झाली होती. त्यांनी श्रमिक महिला संघाच्या राज्यप्रमुख पदाची देखील जबाबदारी सांभाळली होती. आपल्या राजकीय, सामाजिक पटलावर त्यांनी स्वतःची एक वेगळी छबी निर्माण करण्यात यश मिळवले. बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांनी कायम शरचंद्र पवार साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पक्षनिष्ठ आणि नेतृत्व निष्ठावंत म्हणून प्रामाणिकपणे कार्यकर्त्याची जबाबदारी पार पाडली.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा ओबीसी असा संघर्ष टोकाचा गेलेला असताना सुद्धा त्यांनी स्वतः ओबीसी असताना सुद्धा पक्षाचे आदेश हेच अंतिम आदेश मान्य करून ओबीसी उमेदवाराच्या विरोधात मराठा उमेदवाराच्या बाजूने पक्षाचा उमेदवार म्हणून प्रामाणिकपणे काम तर केलेच शिवाय मतांचे विभाजन टाळून मतांची जोडणी करण्यात यशस्वी झाल्यामुळेच अशक्य असा विजय लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच महाविकास आघाडीच्या पारड्यात मिळू शकला. यामध्ये निश्चितच ताईंचा खारीचा वाटा नक्कीच होता. त्याचबरोबर विद्यमान विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाने विद्यमान आमदाराला त्याची निष्ठा पाहून पुन्हा एकदा संधी द्यावी अन्यथा पक्ष उमेदवार बदलणार असेल तर माझ्यासारख्या पक्षातील ज्येष्ठ आणि कर्तुत्व पाहून,महिला प्रतिनिधी म्हणून प्राधान्याने उमेदवारी द्यावी अशी केलेली प्रामाणिक मागणी बीड विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर राज्यात एक आदर्शवत चर्चेचा विषय ठरत आहे. ताईंनी बीड विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे जाहीर करून आपली इच्छाशक्ती प्रगट केल्याने मतदार संघातील लाडक्या महिला मतदारांमध्ये विशेषतः उत्साह संचारला असल्याचे दिसत आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.