शिवसेनेचे वाघ निघाले गोरेगावला…! उध्या शिवसेनेचा वर्धापनदिन पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा होणार !!!
मुंबई: शिवसेना धनुष्यबाणासह पक्षप्रमुख मा.एकनाथ शिंदे यांचेकडे आल्यानंतर शिवसेनेचा ५७ वा वर्धापनदिन मुंबईच्या गोरेगाव येथील मेक्सिको च्या भव्य ग्राउंड वर उध्या साजरा होत असून, प्रस्तुत कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कोना-कोपर्यातून शिवसेनेच्या वाघांचे लोंढे गोरेगाव च्या दिशेने रवाना होत असल्याचे दिसत आहेत. मोठ्या थाटात शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असल्याने त्याची जय्यत तयारी शिवसैनिकांकडून पुर्ण झाली आहे. 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. या वर्धापनदिनानिमित्त शिंदे यांच्या शिवसेनेकडून पोस्टर प्रकाशित करण्यात आले आहेत.
शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. त्याची जय्यत तयारी शिवसैनिकांकडून पुर्ण झाली आहे.. 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. या वर्धापनदिनानिमित्त शिंदे यांच्या शिवसेनेकडून पोस्टर प्रकाशित करण्यात आले आहेत. 19 जूनला शिंदेंच्या शिवसेनेकडून गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. ‘वाघ निघाले गोरेगावला’ असं या पोस्टरवरती उल्लेख करण्यात आला आहे. हे पोस्टर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून व्हायरल करण्यात आले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.