चंदनसावरगाव येथे पीकविमा व विज प्रश्नांनी शेकापचा एक तास चक्काजाम!शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करु-भाई मोहन गुंड.
केज: केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथे (दि.०३) सप्टेंबर २०२३ रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने केज-अंबाजोगाई रोडवरील चंदनसावरगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेकाप चे नेते भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलकानी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी केज तालुक्यातील सह सर्व मंडळात सरसकट अग्रीम पिक विमा लागु करा.केज तालुक्यातील मागील वर्षाच्या अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ वाटप करा.शेती पंपाची लोडशेडिंग बंद करून उच्च दबाने विद्युत पुरवठा करा.२०२० चा पिक विमा तात्काळ वाटप करा.जालन्यात आंदोलकांवर झालेल्या लाठी हाल्ल्याची चौकशी करून दोषीवर कारवाई करा,चंदनसावरगाव-केकत सारणी,चंदनसावरगाव कुंभारवाडा,चंदनसावरगाव-भाटुंबा या रस्त्याची दुरुस्ती करा यासाठी शेकापच्या वतीने अदोलन करण्यात आले. या अदोलनास मा.आ.पृथ्वीराज साठे,हनुमंत भोसले,हनुमंत सौदागर,हनुमंत घाडगे,शिवाजी ठोंबरे यांनी मनोगत व्यक्त करुन आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी भाई अशोक रोडे,शत्रुघ्न तपसे,गणेश तपसे,संजय तपसे,ॲड,राजेश शिंदे,ॲड,अक्षय इंगळे,महादेव ढवारे,भाई मंगेश देशमुख,भाई बाबाराजे गायकवाड,रमेश पाटुळे,महेश गायकवाड,सुग्रीव तपसे,शशिकांत इंगळे,गणेश चाळक सर,बाळासाहेब चवरे,भैय्या जगताप, मधुकर तपसे,जालिंदर दळवी,महेश तपसे, उत्तरेश्वर तपसे,सुंदर तपसे,अमोल थोरात, बालाजी नागरगोजे,भारत नागरगोजे,अजित पौळ,अभिजित चवरे,यासह अनेक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते,युवक वर्ग मोठ्या संख्येने या रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदन पत्रातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मार्गी न लागल्यास तीव्र सरूपाच आंदोलन करु अशा इशारा भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी रस्ता रोको आंदोलनात दिला आहे.आंदोलनात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता.आंदोलना पासून एक किलोमीटर पर्यत वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती.आंदोलनानंतर पोलीस प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्यातआली.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.