ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उद्या बुधवार दि.१०/१/२०२४ रोजी संपन्न होणाऱ्या ना.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या जनसंवाद तथा “शिवसंकल्प अभियान” कार्यकर्ता मेळावा  सभेच्या पार्श्वभूमीवर महिला संपर्कप्रमुख सौ.रत्नमालाताई मुंडेंच्या काॅर्नर बैठका संपन्न!

पाठलाग न्युज/प्रतिनिधि:

उद्या बुधवार दि.१०/१/२०२४ रोजी संपन्न होणाऱ्या ना.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या जनसंवाद तथा “शिवसंकल्प अभियान” कार्यकर्ता मेळावा  सभेच्या पार्श्वभूमीवर महिला संपर्कप्रमुख सौ.रत्नमालाताई मुंडेंच्या काॅर्नर बैठका संपन्न!

नांदेड: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते ना.एकनाथराव शिंदे साहेब उद्या नांदेड-हिंगोली लोकसभा परिक्षेत्रातील तमाम नागरिकांशी संवाद साधण्यासाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील आखाडा बाळापूर येथे येत असून, संपन्न होणाऱ्या “शिवसंकल्प अभियान”.कार्यकर्ता मेळावा”  विराट सभेच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा विभागाचे संपर्कनेते तथा नांदेड-हिंगोलीचे लोकसभा संपर्कप्रमुख मा.श्री.आनंदराव जाधव साहेब यांच्या आदेशानुसार व नांदेड-हिंगोलीच्या महिला संपर्कप्रमुख सौ.रत्नमालाताई म॔डे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ.शीतलताई भांगे व गिताताई पुरोहित यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी महिलांच्या आढावा बैठका घेण्यात आल्या.

अर्धापूर,हातगाव, नांदेड मधील एम.आय.डि.सी भागातील नाथनगर, पुरोहित यांचे निवासस्थान व उत्तरचे आमदार श्री.बालाजीराव कल्याणकर यांच्या “शिवालय” येथे महिलां च्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.मा.मुख्यमंत्री साहेबांच्या जनसंवाद कार्यक्रमानिमित्त महिलांचा मोठा प्रतिसाद दिसून येत होता.सदरील बैठकांमधून महिला संपर्कप्रमुख सौ.रत्नमालाताई मुंडे यांनी महिलांना मार्गदर्शन करत मा.मुख्यमंत्री साहेबांच्या जनसंवाद सभेला मोठ्या संख्येने हाजर राहण्याचे आवाहन केले.

ठिकठिकाणच्या बैठका यशस्वी करण्यासाठी हिंगोलीचे खासदार तथा शिवसेनेचे उपनेते श्री हेमंत भाऊ पाटील, नांदेड उत्तरचे आमदार श्री.बालाजीराव कल्याणकर, नांदेड चे जिल्हाप्रमुख आनंदजी बोंडारकर,जिल्हाप्रमुख उमेशजी मुंडे यांनी सहकार्य केले.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये