ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मोदी लाट ओसरल्याचे लक्षात येताच बीड जिल्ह्यातील अनेक नेते व आमदार परतीच्या मार्गावर?

पाठलाग न्युज/परमेश्वर गित्ते:

मोदी लाट ओसरल्याचे लक्षात येताच बीड जिल्ह्यातील अनेक नेते आणि आमदार घर वापसीच्या मार्गावर?

 बीड: राज्यात व देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा ‘परफॉर्मन्स ‘ म्हणावा तसा चालला नाही. महाराष्ट्रात महायुती 43 वरून थेट 17 वर येऊन ठेपली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची लाट ओसरल्या सारखी स्थिती दिसली. विधानसभा निवडणुकीत सुद्धा भाजपला व महायुतीला फार करिष्मा दाखवता येईल अशी परिस्थिती दिसत  नाही.म्हणून बीड जिल्ह्यातील काही विद्यमान आमदार व अनेक नेते हे परतीच्या मार्गावर असल्याचे दिसत आहेत.परंतु जुन्या पक्षाकडून त्यांना सध्या तरी ‘वेट अँड वॉच ‘ सांगितले जात अनेकांचा हिरमोड दिसत आहे. परंतु,  हिरमोड असलेले हे नेते व आमदार  आपल्या जुन्या पक्षात जाणार हे निश्चित आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देशात व राज्यात महायुतीचे चांगले प्रदर्शन राहील असे वाटत होते.मात्र राष्ट्रवादी (अजितदादा पवार गट) सोबत घेतल्याने राज्यातील वातावरण पूर्णतः बदलून गेले. मुळातच भाजपाच्या धोरणा विरोधात जनसामान्यांमध्ये संताप होता.पक्ष फोडाफोडी आणि भ्रष्टाचारी नेत्यांना सोबत घेण भाजपाला परवडलं नाही. भाजपकडून भ्रष्टाचारी नेत्यांना जेलची हवा खाऊ घालणं अपेक्षित होतं. मात्र भाजप नेतृत्वाने व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व गृहमंत्री अमित शहा हे चार दिवस अगोदरच राष्ट्रवादी किंवा खा.अशोक चव्हाण यांच्यावर आरोप करतात आणि त्याच नेत्यांच्या प्रवेशासाठी मोदी -शहा पायघड्या घालून उभे ठाकतात हे चित्र अनेकांना पटलेलं नाही. मुळात भाजप व संघांने याविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे. . भाजपच्या ‘ कथनी आणि करणी ‘ मध्ये आता फरक दिसू लागला आहे. म्हणून राज्यातील जनतेने भाजप व महायुतीला कात्रजचा घाट दाखवला व थेट 43 वरून 17 वर आणून ठेवले. यातील मुंबईची एक जागा केवळ एका मताने जिंकली आहे.तसेच काही जागा या कमी मताच्या फरकाने जिंकल्या आहेत. त्यातच ‘ पिपाणी ‘ हे चिन्ह महायुतीला पावलेले आहे. नाहीतर केवळ दहा ते बारा जागाच महायुतीला जिंकता आल्या असत्या. आता सुद्धा अध्याप परिस्थिती बदललेली नाही. ओबीसी, मराठा,मुस्लिम,बौद्ध हा वाद तसाच आहे.त्या आगीमध्ये तेल ओतण्याचे काम भाजपच्या काही नेत्यांकडून सुरू आहे. बीड जिल्ह्यातील नेत्यांनी व काही आमदारांनी विद्यमान परिस्थितीचे अवलोकन करून आता भाजपसोबत व महायुती सोबत राहणे परवडणारे नाही म्हणून त्यांचा तत्कालीन पक्ष राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट), काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाकडे जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून लागले आहे. अनेकांनी मध्यस्थामार्फत चर्चा चालू केली आहे.जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद टोकाला पोहोचला आहे. त्याचे पडसाद महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारावर पडण्याची शक्यताआहे.शिवाय आज शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या विषयी ‘ गुडवील ‘आहे म्हणूनच जिल्ह्यातील काही आमदार व नेते जुन्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत.या आमदारांचा व नेत्यांचा भाजपला सुद्धा काही एक परिणाम झाला नाही.

सध्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जादू ओसरली असून ,मोदी सरकार हेच चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांच्या कुबड्यावर आहे.म्हणून हे कधीही कोसळू शकते अशीच शक्यता निर्माण झाली आहे.तसेच बीड जिल्ह्यात तेवढा प्रभाव भाजपा व महायुतीचा राहिला नसल्याने विधानसभेला पराभूत उमेदवार म्हणून मिरवण्यापेक्षा पुन्हा शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय अनेकांनी घेतल्याचे दिसू लागले आहे. केजमधील मातब्बर नेते, माजलगाव मधील मातब्बर नेते,गेवराईचे आमदार व इतर ठिकाणचे काही आमदार यांनी खा. शरदचंद्र पवारांची भेट घेऊन ‘ आमचं तेवढं बघा ‘ म्हटल्याची जिल्हाभर चर्चा आहे. पवारांनी सुद्धा या दगाबाजांना आणि सुपारीबाजाना ‘ अभी नही ‘ म्हणत थोडं थांबण्यास सांगितले असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरु आहे. मोदींची जादू ओसरल्यावर तात्काळ भाजपातून उडी मारून जाणारे सुद्धा बीड जिल्ह्यात कमी नाहीत. आगे आगे देखो होता है क्या?

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये