क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केज तालुक्यातील तांबवा येथील शिक्षण संस्थाचालकाच्या लाचखोरीच्या खटल्यातील आरोपींना केज जिल्हा व सत्र न्यायालयाचे “अजामीनपात्र ” अटक वॉरंट.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

केज तालुक्यातील तांबवा येथील शिक्षण संस्थाचालकाच्या लाचखोरीच्या खटल्यातील आरोपींना केज जिल्हा व सत्र न्यायालयाचे “अजामीनपात्र ” अटक वॉरंट.

न्यायासनाची दिशाभूल करत न्यायालयाच्या प्रक्रियेला वारंवार आळीपाळीने हुलकावण्या देणाऱ्या लाचखोरीच्या खटल्यातील आरोपींना केज जिल्हा व सत्र न्यायालयाचे ‘अजामीनपात्र’ अटक वारंट.

 

केज: सन 20 22 च्या नवीन वर्षाची सुरुवात आणि पाडव्याची गुढी उतरण्याच्या धामधुमेच्या वेळेला शिक्षण क्षेत्रातला काळा व्यवहार उघड करणाऱ्या बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या  केज येथील यशस्वी सापळा धाडीने गाजलेल्या खटल्यातील सर्वच आरोपी केज येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायालयीन प्रक्रियेत आळीपाळीने गैर हजर राहून अडथळे निर्माण करत माननीय न्यायालयाचा वेळ वाया घालवत असल्याचे समोर आल्यामुळे प्रस्तुत खटल्यातील सर्वच आरोपींना केज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने ‘अजामीनपात्र’ अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिल्यामुळे न्याय प्रक्रियेत जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करणाऱ्या आशाच खटल्यातील  आरोपीमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की केज तालुक्यातील तांबवा येथील गणेश माध्यमिक विद्यालयाचे एक अन्यायग्रस्त शिक्षक सन. 20 21 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर 12 लाखांच्या लाच  वसुलीसाठी सन 2022 पर्यंत त्यांचा सेवा निवृत्ती प्रस्ताव संस्था चालकांनी वरिष्ठांकडे मंजुरीसाठी  पाठवला नाही. संबंधित सेवानिवृत्त शिक्षकाला विना डोनेशन  पेन्शन दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या अर्थ खात्याच्या व्यवहारात “वित्तीय अनियमितता” होण्याच्या काळजीने ग्रासलेल्या संस्थाचालकाने अखेर संबंधित शिक्षकाकडून बारा लाख रुपये लाच घेऊन शासनाच्या वित्तीय अनिमित्तेवर तोडगा काढला आणि सदर लाचखोरीचा  व्यवहार पार पाडताना दीड लाखाचा पहिला हप्ता घेताना संबंधित संस्थेचे सचिव डॉ. अशोक हरिभाऊ चाटे, गणेश माध्यमिक विद्यालयाचे   मुख्याध्यापक असलेले त्यांचेच भाच्चे अनंत बाबुराव हांगे, तडजोडी साठी सल्लागार असलेले त्याच गावातील ऊसतोड विकास मंडळ या संस्थेचे  दुसरे संस्था चालक तथा साने गुरुजी निवास विद्यालयाचे मुख्याध्यापक उद्धव माणिकराव कराड आणि भारतीय जनता पार्टीचे  पदाधिकारी  दत्तात्रय सूर्यभान धस यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सापळा कार्यवाही  रंगलेल्या हाताने पार पडली  होती. यातील सर्व आरोपींना अटक व पोलीस कोठडी झाल्यानंतर प्रत्येकी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली होती. प्रकरणाच्या सखोल तपासानंतर सदरच्या खटल्याचे दोषारोपपत्र दिनांक 13 /3/ 20 24 रोजी केज येथील जिल्हा व सत्र न्यायालयात क्रमांक 85/2024 नुसार दिनांक 15 /3 /20 24 रोजी फायलिंग होऊन सदरचे दोषारोपपत्र दिनांक 16 /3 /20 24 रोजी क्रमांक 9/2024 प्रमाणे रजिस्टर झालेले आहे. प्रस्तुत प्रकरणात पहिली हेरिंग दिनांक 16 /3/ 20 24 रोजी झाल्यानंतर आजपर्यंत 11 ते 12 तारखा होऊन गेलेल्या आहेत, परंतु प्रत्येक तारखेला संबंधित खटल्यातील आरोपी आळीपाळीने किवा सर्वांनी एकदाच गैरहजर राहणे व न्यायालयाचा वेळ जाणीवपूर्वक वाया घालवत असल्याचे समोर आले आहे. सध्या प्रस्तुत प्रकरणात “आरोप निश्चिती” करण्यासाठी ची स्टेज असूनही संबंधित आरोपी हे जाणीवपूर्वक गैरहजर राहून न्याय प्रक्रियेत अडथळे निर्मान करत असल्याचे समोर आल्यावरून माननीय न्यायालयाने सर्वच्या सर्व आरोपींना दि. 28/3/2025 च्या सर्व आरोपी व त्यांच्या वकिलांच्या गैरहजरीनंतर प्रस्तुत सर्व आरोपींना अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहेत.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये