ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

बीड जिल्ह्यातील तीन मतदारसंघ भाजपला तर, तीन मतदार संघ राष्ट्रवादी अजित पवार गटाला! केज, परळी व गेवराई राष्ट्रवादीला तर बीड,आष्टी व माजलगाव भाजपला?

पाठलाग न्युज/परमेश्वर गित्ते:

बीड जिल्ह्यातील तीन मतदारसंघ भाजपला तर, तीन मतदार संघ राष्ट्रवादी अजित पवार गटाला!

केज, परळी व गेवराई राष्ट्रवादीला तर बीड,आष्टी व माजलगाव भाजपला?

बीड: बीड लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलत आहेत.जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात पूर्वी महाविकास आघाडीला उमेदवार मिळेल का? अशी चर्चा होती मात्र आता उमेदवारांचा भरणा मोठ्या प्रमाणात होत आहे.बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पाहता महायुतीचा वरचष्मा आहे. जिल्ह्यात बदलाचे व परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे महायुती यावेळी समसमान जागावाटप करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. बीड जिल्ह्यातील तीन मतदारसंघ भाजपा लढवणार आहे तर तीन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट )लढवणार आहे.राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडल्यानंतर यातील बरेच चित्र स्पष्ट होईल. बीड लोकसभा निवडणुकीआधी महाविकास आघाडीची परिस्थिती जेमतेम होती. कोणीही महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते. कारण तेवढे प्राबल्य जिल्ह्यात नव्हते तेवढी ताकद नव्हत. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर ‘ बदल होऊ शकतो ‘ हे लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले. राज्यात मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीत मातब्बर नेत्यांचे प्रवेश सोहळे होत आहेत. महायुती मधील अनेक नेते महायुती सोडून महाविकास आघाडीत येत आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सत्ताधाऱ्याच्या विरोधातील मतदारांमधील राग व संताप कमी करण्यासाठी महायुती वेगवेगळे प्रयत्न करत आहे.बीड जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. पुढील 2029 साली मतदार संघाची पुनर्रचना होणार आहे. यात एका विधानसभा मतदारसंघाची संख्या वाढणार आहे. लोकसंख्या व मतदार तेवढ्या संख्येने वाढले आहेत. त्यामुळे ही निवडणूक सर्वत्र इच्छुक उमेदवारांना पहिली आणि शेवटची ठरणार आहे.कारण पुढील २०२९ ची पुनर्रचना कशी असेल ते कोणालाही सांगता येत नाही.म्हणून यावेळी निवडणूक लढविण्याची ‘ हौस ‘ फेडली जाणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघातील बलाबल पाहिले तर महायुतीचा वरचष्मा आहे. सहापैकी दोन मतदारसंघात भाजपा व तीन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट )प्रभावी तर बीड विधानसभा मतदारसंघ हा शरदचंद्र पवार गटाच्या ताब्यात आहे.सध्या जिल्ह्यात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. प्रस्थापितांना धक्का देण्याची तयारी मतदारांनी चालवली आहे. तेच ते चेहरे व नेते पाहून मतदार कंटाळले आहेत. शेवटची संधी म्हणत म्हणत कोणीही घरी बसायला तयार नाही.म्हणून मतदारानीच यांना घरी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीने बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.ज्यामध्ये तीन मतदारसंघ भाजपा लढवणार आहे तर तीन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) लढवणार आहे. जिल्ह्यातील काही मतदारसंघात अदलाबदल केला जाणार आहे.जातीय व राजकीय समीकरणाप्रमाणे तो मतदार संघ त्या पक्षाला सोडला जाणार आहे.त्यामध्ये भाजपाला आष्टी, बीड व माजलगाव हे मतदार संघ सुटले जातील तर केज, परळी व गेवराई विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गटाला) सोडले जातील. उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस हे आष्टीची जागा आमदार सुरेश धस यांच्यासाठी सोडून घेणार आहेत तर आमदार लक्ष्मण पवारांना उमेदवारीची शक्यता कमी आहे. त्या ठिकाणी माजी आमदार अमरसिंह पंडित यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गटाकडून )उमेदवारी मिळणार आहे.माजलगाव मतदार संघातून आमदार प्रकाश सोळंके यांचा भाजप प्रवेश करून त्यांना त्या ठिकाणची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.परळी विधानसभा मतदारसंघातून नामदार धनंजय मुंडे हेच उमेदवार असतील. केज मध्ये उमेदवार बदलीची चर्चा आहे मात्र तसे होईल का? याचे उत्तर कोणाकडेही नाही.

केज-अंबाजोगाई मतदारसंघाच्या विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा.

बीड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून प्रभावी चेहरा आणला जाणार आहे.येणारा काळ हा लक्षवेधी व घडामोडीचा असणार आहे.अनेक मातब्बर इच्छुक उमेदवार खा. शरदचंद्र पवार, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या संपर्कात आहेत. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात यावेळी तगडी फाईट होणार आहे.एकतर्फी निवडणूक होणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये