ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ॲड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला अनेक “हत्या” प्रकरणातील आरोपीचे उच्च न्यायालयात आव्हान!!

पाठलाग न्युज:

ॲड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला अनेक “हत्या” प्रकरणातील आरोपीचे उच्च न्यायालयात आव्हान!!

लोकसभेची निवडणुक लढवलेले परंतु काँग्रेसकडून पराभूत झालेले ॲड. उज्ज्वल निकम यांची निवडणूक पराभवानंतर पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली असून, ॲड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला एका हत्या प्रकरणांतल्या आरोपीने आव्हान दिले असून, त्याने मुंबई हायकोर्टाकडे अॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे. उज्ज्वल निकम यांनी महायुती तर्फे उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. पण काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा १६,००० हून अधिक मतांनी पराभव केला. यांनतर सरकारने पुन्हा त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र यावर काँग्रेसनेही आक्षेप घेतल्यानंतर आता मात्र अनेक हत्या प्रकरणांत आरोपी असलेलया विजय पालांडेने ॲड. उज्ज्वल निकम यांच्या विशेष सरकारी वकील म्हणून केलेल्या नियुक्तीला कोर्टामध्ये आव्हान दिले आहे.विजय पालांडेने केलेल्या याचिकेमध्ये उज्ज्वल निकम यांची वाईट हेतूने नियुक्ती करण्यात आली असल्याचे नमूद करत सदरची नियुक्ती रद्द करावी असे म्हटले आहे. ॲड. उज्ज्वल निकम यांनी भाजपतर्फे निवडणूक लढवली आहे. त्यामुळे त्यांची ओळख, हेतू, विचार, अजेंडा बदलेला आहे. ते आता भाजपचे नेते आहेत, असे पालांडेने याचिकेत म्हटले आहे. ते आता राजकीय पक्षाच्या अजेंड्यासाठी काम करतील. भाजपची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी ते हाय-प्रोफाइल प्रकरणांतील कथित आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून कोणत्याही थराला जातील आणि ते आरोपीच्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात असेल., असे पालांडेने आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये