केजचे प्रभारी तहसीलदार तथा केज न.प.चे मुख्याधिकारी पदाचा पदभार केजच्या सचिन देशपांडे यांचेकडे!
केज: लाचलुचपत प्रतिबंधक कारवाईत अडकलेले केज येथील तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या वर तहसीलकार्यालयातील कोतवालाने एका स्वस्त धान्य दुकानावर कारवाई न करण्या साठी वीस हजाराची लाच घेतल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यापासून फरारी असलेल्या केज तहसिलच्या तहसीलदारपदाचा रिक्त असलेला अतिरिक्त पदभार केजचे रहिवासी तथा अंबाजोगाई येथील नायब तहसिलदार सचिन देशपांडे यांनी मंगळवारी स्विकारला असुन पंधरा दिवसापुर्वीच त्यांनी केज नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचाही अतिरिक्त पदभार स्विकारला असुन, केज तालुका व शहरातील नागरिकांनी त्यांचे स्वागतव आभिनंदन केले आहे. याबाबत अधिक माहीती अशी की,दि.३१ मे रोजी रात्री अंबाजोगाई महामार्गावरील एका हॉटेलमध्ये केज येथील तहसील कार्यालयातील कोतवाल माने याला धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वीस हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले होते.या प्रकरणी केजचे तहसिलदार अभिजीत जगताप यांच्यावर ही गुन्हा नोंद झाला होता.तेंव्हा पासुन केज तहसिलदार पदाचा पदभार घेण्यासाठी अनुत्सुकता दिसत होती.त्यामुळे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनीअंबाजोगाईचे नायब तहसिलदार सचिन देशपांडे यांच्याकडे केजच्या तहसिलदार पदाचा अतिरिक्त पदभार देण्याचे आदेश काढले होते.त्यानुसार सचिन देशपांडे यांनी मंगळवारी केजच्या तहसिलदार पदाचा अतिरिक्त पदभार नायब तहसिलदार आशा वाघ- गायकवाड यांचे कडुन स्विकारला आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.