“ईव्हीएम मशीन हॅक करून देतो अडीच कोटी द्या”; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे मागणी करणारा भामटा गजाआड.
संभाजीनगर:देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, तिसऱ्या टप्प्यातील मतदान देखील पार पडले आहे. पंरतु, काही ठिकाणी ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना देखील समोर येत आहेत. मात्र, ही वास्तव परिस्थिती समोर असतांनाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे एका व्यक्तीने ईव्हीएम मशीन हॅक करून देतो, असे म्हणत अडीच कोटींची मागणी केल्याचा प्रकार समोर आल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार, इव्हीएम मशीन हॅकर्स चे नाव मारुती ढाकणे असे असून तो लष्करातील जवान आहे. सध्या तो जम्मू-काश्मीरमध्ये नियुक्तीवर आहे.
ढाकणे हा मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते. या व्यक्तीने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात वापरण्यात येणारे सगळे ईव्हीएम मशीन हॅक करुन देतो आणि पाहिजे तसा निकाल लावून देतो,असे म्हणत त्या बदल्यात पैसे हवेत अशी मागणी केल्याचे अंबादास दानवे यांनी पोलीसाना सांगितले.त्यानंतर दानवे यांनी आपल्या भावाकडून संबधित व्यक्तीला पैसे देतो असे सांगून पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. यानंतर दानवे यांचे भाऊ एक लाख रुपये देण्यासाठी ढाकणे याच्या भेटीला एका हॉटेलमध्ये गेले असता सोबत असलेल्या पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.यावेळी पोलिसांनी संशयिताची विचारपूस केली असता त्याने कर्जबाजारी असल्याने आपल्याला ही कल्पना सुचली असे म्हणत हा प्रयत्न केल्याचे म्हटले. तसेच या कामासाठी ढाकणे याच्याकडे काही आक्षेपार्ह गोष्टी देखील आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. इव्हीएम मशीन हॅक करणे ही बाब केवळ कल्पना जरी असली तरी,केवळ विरोधासाठी जनतेची दिशाभूल करुन संशय वाढवण्यापुरती सत्य असल्याचे आता स्पष्ट झालेले असल्याच्या ठाम विश्वासामुळेच विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी हा प्रकार उघडकीस अनल्याची चर्चा आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.