मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’अंतर्गत जिल्ह्यातील युवकांना शासकीय निमशासकीय तसेच खासगी कार्यालयात रोजगारची संधी.
बीड : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील युवकांना शासकीय निमशासकीय तसेच खाजगी कार्यालयात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे राबवली जाणार आहे.
यासंदर्भात बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाची प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना वर्ष 2024 25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्याची मान्यता देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत तयार केलेल्या. https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल यासाठी इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर नोंदणी करावी.या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना/ उद्योजकांकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10 % टक्के व सेवा क्षेत्रासाठी 20% उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय निमशासकीय या आस्थापना उद्योग महामंडळ यामध्ये मंजूर पदाच्या 5 % टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. मात्र आस्थापना उद्योग यांनी त्यांच्याकडील कार्यरत मनुष्यबळाची माहिती अचूक दर्शविणे आवश्यक आहे. तसे न केल्यास प्राधिकृत अधिकारी हे शिक्षेस पात्र राहतील. 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र राहतील.शैक्षणिक अर्हतेनुसार दिले जाईल विद्यावेतन:-— प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासनामार्फत विद्या वेतन दिले जाईल. अंतर्गत बारावी पास प्रशिक्षणार्थींना 6000/- रुपये प्रतिमाह, आयटीआय पदविका अशा प्रशिक्षणार्थींना 8000/- रुपये प्रतिमाह दिला जाईल. पदवीधर आणि पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना 10,000/- रुपये महिना प्रतिमाह दिला जाईल.
बीड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार यांनी उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीड सुनील उचले यांच्याकडून करण्यात आले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.