ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
“हेल्मेट” या लघु चिञपटातुन प्रा.कलढोणे यांनी तरुणांना सावधानतेचा संदेश दिला.—-पंकज कुमावत.
पाठलाग न्युज/प्रतिनिधी:

“हेल्मेट” या लघु चिञपटातुन प्रा.कलढोणे यांनी तरुणांना सावधानतेचा संदेश दिला.—-पंकज कुमावत.
केज:/प्रतिनिधी:सध्याच्या तरुणांमध्ये बाईकवरुन वेगात जाणे ही एक क्रेझ झाली आहे.परंतु प्रवास करतांना हेल्मेट वापरल्यास अनमोल जीवन वाचवु शकते हा महत्वपुर्ण संदेश या लघु चिञपटातुन मिळाला आहे असे प्रतिपादन सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांनी केले.केज सारख्या ग्रामिण भागातुन अशा महत्वपुर्ण विषयावर लघुचिञपट निघाल्यामुळे व प्रसारा मुळे आमच्या ही कामात मदतच होणार आहे.हेल्मेट ही शो ची वस्तु न होता त्यास वापरुनच मोटर सायकल वापराव्यात असे ही आय.पी.एस.पंकज कुमावत यांनी सांगितले. ते केज येथील प्रा.ज्ञानेश कलढोणे यांनी स्वतः दिग्दर्शन केलेल्या हेल्मेट या लघुचिञपटाच्या उद् घाटन सोहळ्यात बोलत होते.अध्यक्ष स्थानी डॉ.दिनकर राऊत हे होते.प्रमुख उपस्थिती मध्ये डी.डी.बनसोडे,प्रा.हनुमंत भोसले ,डॉ.बी.जे.हिरवे उपस्थित होते.या प्रसंगी इंडीयन नेव्ही व पोलीस भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुञ संचालन प्रा.ज्ञानेश कलढोणे यांनी केले ,प्रास्ताविक प्रा.राऊत यांनी केले तर आभार प्रा.रोडे यांनी मानले.