Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
केज न.पं.च्या वतीने आरोग्य,जनहित व पर्यावरण सेवा सप्ताह व आ. धनंजयजी मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन. नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा-हारुणभाई इनामदार व सौ. सीताताई बनसोड.
पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

केज न.पं.च्या वतीने आरोग्य,जनहित व पर्यावरण सेवा सप्ताह व आ. धनंजयजी मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन. नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा-हारुणभाई इनामदार व सौ. सीताताई बनसोड.
प्रतिनिधी/केज: केज न.पं. वतीने आरोग्य, जनहित व पर्यावरण सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, तरी केज शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आरोग्य शिबिराचा लाभ घेन्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त केज नगरपंचायत च्या वतीने आरोग्य, जनहित व पर्यावरण सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त या सेवा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हारणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. सेवा सप्ताहानिमित्त कार्यक्रम दिनांक १५ जुलै २०२५ रोजी सकाळी ठीक ११-०० वाजता केज नगरपंचायत कार्यालय येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर या कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दत्तात्रय केंद्रे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, दिनांक १६ जुलै २०२५ रोजी ठीक सकाळी ११-०० वाजता नगरपंचायत कार्यालय केज येथे नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न होणार आहे.दिनांक १७जुलै २०२५ रोजी सकाळी ठीक ११-०० वाजता स्वामी समर्थ वर्धाश्रम, बोबडेवाडी रोड केज येथे वृद्धाश्रमातील महिलांना साड्याचे वाटप व अन्नदानाचा कार्यक्रम, दिनांक १८ जुलै २०२५ रोजी सकाळी ठीक ११-०० वाजता नगरपंचायत कार्यालय केज येथे संजय गांधी निराधार योजना लाभार्थी यांचे आधार ई-केवायसी कॅम्प, या कार्यक्रमाचे उद्घाटन केज तहसील चे तहसीलदार राकेश गुडे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.दिनांक १९ जुलै २०२५ रोजी सकाळी ठीक १०-०० वाजता केज शहरातील सर्व शाळेतील गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप व दिनांक २० जुलै २०२५ रोजी सकाळी ठीक ११-०० वाजता नगरपंचायत कार्यालय केज येथे बांधकाम मिस्तरी, बचत गट, छोटे व्यापारी, घरकुल धारक यांना त्यांच्या उपयोगी वस्तूंचे वाटप, या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ स्त्री रोग तज्ञ डॉ. त्रिंबकराव चाटे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे., दिनांक २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ठीक ११-०० वाजता नगरपंचायत कार्यालय केज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदस्य नोंदणी अभियान, या कार्यक्रमाचे उद्घाटन हारुणभाई इनामदार यांच्या हस्ते संपन्न होणार, दिनांक २२ जुलै २०२५ रोजी सकाळी ठीक ११-०० वाजता जे के मंगल कार्यालय महात्मा फुले नगर केज येथे सर्व धर्मीय धर्मगुरूच्या व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित केज शहरात ५५५५ वृक्ष लागवडीचा शुभारंभ कार्यक्रमाचे उद्घाटन वृक्षप्रेमी तथा सिने अभिनेते सयाजीराव शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तरी या आरोग्य, जनहित व पर्यावरण सेवा सप्ताह मध्ये केज शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सप्ताहाचा व आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जेष्ठ नेते हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांनी केले आहे.




