केज पंचायत समिती कार्यालय येथे कायदे विषयक जनजागरण शिबीर संपन्न .
केज : केज पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात कायदे विषयक जनजागरण शिबीर दि.२० फेब्रुवारी २०२४ रोजी तालुका विधी सेवा समिती व वकीलसंघ केज यांच्या संयुक्त विद्यमाने कायदे विषयक जन जागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते ,सदरचे शिबिर पंचायत समिती केज येथे दुपारी ०२-०० वाजता आयोजित करण्यात आले होते. दरम्यान,या कार्यक्रमा च्या अध्यक्षपदी केज न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश श्री.एन.डी. गोळे तिसरे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती ए.टी जगताप मॅडम होत्या.या कार्यक्रमास सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती सविता शेप, विस्तार अधिकारी काशीद सर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. चाटे सर, विधीज्ञ सर्वश्री डी.टी. सपाटे, एस.व्ही. मिसळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन एस.व्ही. मिसळे यांनी केले. जनजागृती शिबीर कार्यक्रमाची प्रस्तावना डी.टी. सपाटे यांनी केली. यावेळी डी.टी. सपाटे यांनी महाराष्ट्र सार्वजनिक सेवा हक्क अधिनियम या विषयावर विस्तृत अशी माहिती सांगितली. तिसरे सह दिवाणी न्यायाधीशश्रीमती ए.टी. जगताप यांनी जागतिक सामाजिक न्याय दिन या विषयावरसविस्तर असे मार्गदर्शन केले. त्या बोलताना म्हणाल्या की, जगभरात २० फेब्रुवारी हा दिवस जागतिक सामाजिकन्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी धर्म, जात, लिंग इत्यादी विविध आधारावर विभागलेल्या लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न जातो. सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी अनेक तरतूद करण्यात आल्या असून त्या आधारे अनेक कायदेही करण्यात आले असल्याचे त्या म्हणाल्या. पुढे बोलतानात्याम्हणाल्या की, स्त्री – पुरूष असा भेद न करता प्रत्येक क्षेत्रात जसे की, आरक्षण असो, नौकरी असो, कोणत्याही घटकांमध्ये समान न्याय असायला हवा. गर्भनिदाना बाबत बोलताना त्या म्हणाल्या की, याबाबत कडक कायदा केल्यामुळे गर्भनिदानाचे प्रमाण खुप प्रमाणात कमी झाले आहे. तसेच हिमाचल प्रदेशमध्ये समान नागरी अस्तित्वात आल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. अध्यक्षीय समारोप करताना सहदिवाणी न्यायाधीश श्री. एन.डी.गोळे यांनी अन्न आणि शिक्षणाचा अधिकार याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. आभार विस्तार अधिकारी काशीद सर यांनी मानले. कार्यकमास आशासेविका, बचतगटा च्या महिला, पंचायत समिती कर्मचा-यांसह ९० लाभार्थी उपस्थित होते.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.