दिलखुलास’ या कार्यक्रमात बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची मुलाखत.
मुंबई: दि, 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात बीड जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांची ‘कायदा व सुव्यवस्था ‘ या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. शनिवार दि.११ मे २०२४ आणि रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत ही मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत श्री. दत्ता देशमुख यांनी घेतली आहे.बीड जिल्ह्यातील जिल्हा पोलिस प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था,जिल्ह्यात होत असलेल्या विविध नेत्यांच्या सभा आणि त्यासाठी होत असलेली कार्यवाही,आदर्श आचारसंहिता उल्लंघन करणाऱ्या विरूद्ध केलेली कार्यवाही ‘याविषयी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून बीड जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी माहिती दिली आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.