Breaking Newsताज्या घडामोडी

केज तालुक्यातील लव्हूरी येथील दहावी परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपी चा बाजार. केंद्रप्रमुखांवार कडक कारवाई करून परीक्षा केंद्र सस्पेंड करण्याची मागणी.

पाठलागन्यूज /अप्पाराव सारुक :

केज तालुक्यातील लव्हूरी येथील दहावी परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपी चा बाजार. केंद्रप्रमुखांवार कडक कारवाई करून परीक्षा केंद्र सस्पेंड करण्याची मागणी.

बीड : शिक्षण आणि परीक्षांचा बाजार झाला असतानाच नुकत्याच चालू झालेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये शिक्षण विभागाचे कॉपी मुक्तीचे आदेश धुडकावून जिकडे तिकडे कॉफीचा सुळसुळाट असल्याचे चित्र दिसून आले असतानाच केज तालुक्यातील लहरी परीक्षा केंद्रावर सर्रास सामूहिक कॉपी केली जात असून, सदरील परीक्षा केंद्र सस्पेंड करावे आणि केंद्रप्रमुखावर कडक कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून केली गेली आहे.दि.२१ रोजी दहावी परीक्षेच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी केज तालुक्यातील लव्हूरी येथील श्री.बडेबाबा विद्यामंदिर लव्हूरी येथे परीक्षा सुरू असताना परिसरातील पालक इष्टमित्र हे बाहेरून गाईड्स,अपेक्षित, इ.फाडून परीक्षार्थी विद्यार्थ्याना सर्रास कॉपी पुरवत गैरमार्गाचा अवलंब करत असून, या गैर प्रकाराला खुद्ध केंद्रप्रमुख व बडेबाबा विद्यालयातील कर्मचारी प्रोत्साहन देत असल्याचे दिसून आले आहे. शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त परीक्षेचा बोलबाला केला जात असलातरी, प्रत्यक्षात परीक्षा केंद्रात व परीक्षा केंद्राबाहेर गैरमार्गाने विविध प्रकारे कॉपी /चिट्याचा पुरवठा केला जात असल्याची बाब समोर आली आहे. @ परीक्षा केंद्राच्या शंभर मीटरच्या परिसरात टू व्हीलर,फोर व्हीलर, गाड्या व कॉपी पुरवणारे टोळके खिडकीवाटे व परीक्षा सेंटर मध्ये आत जाऊन परीक्षा हॉलमध्ये गैरमार्गाने कॉपी पुरवत जात असल्याचे दिसून येत आहे.                          @ कॉपीमुक्त परीक्षेचा बोलबालाअसला तरी,लव्हरी केंद्रावर मात्र प्रत्यक्षात कॉपी मुक्तीचा बोजवारा! परीक्षा केंद्र कर्तृव्यात शून्य !                                                     @ परीक्षावर वाच ठेवणारी भरारी पथके केवळ पाहुणचार घ्यायला आणि लक्ष्मीचे दर्शन घेऊन १०मिनटात भेट नोंदणी करून परत जायला तयार करण्यात आले असल्याचे उघड. @ परीक्षा मंडळास खऱ्यानेच कॉपीमुक्त परीक्षा घ्यावयाची आहे काय? वास्तव पाहून पालकांकडून शंका व्यक्त.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये