Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

कळमनुरी चे नवनिर्वाचित आमदार संतोष दादा बांगर यांना मुंबईला जाण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पाठवले स्पेशल जेट विमान! आमदार बांगर मुंबईला रवाना.

पाठलाग न्यूज / हिंगोली:

कळमनुरी चे नवनिर्वाचित आमदार संतोष दादा बांगर यांना मुंबईला जाण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पाठवले स्पेशल जेट विमान! आमदार बांगर मुंबईला रवाना.

मुंबई : शिवसेनेचे प्रमुख नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे पहिल्यापासूनच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची योग्य दखल घेत असून, वैद्यकीय कारणासाठी हैदराबाद येथे अडकलेल्या नवनिर्वाचित आमदार संतोष दादा बांगर यांना मुंबईला येण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी स्पेशल जेट विमान पाठवले असून, सदर विमानात बसून आमदार बांगर नुकतेच मुंबईला रवाना झाले आहेत. राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्याने महायुतीमधील सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन अभिनंदन करण्यासाठी मोठी रांग लागली आहे. तर, दुसरीकडे विजयी आमदारांसोबत बैठक घेऊन पक्षाचे प्रमुख नेते सत्तास्थापनेवर चर्चा करत आहेत. एकीकडे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता आणि उत्कंठा राज्याला लागली असून, शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आमदारांना मुंबईत आणण्यासाठी खास खासगी जेट पाठवले आहेत. त्यामुळे, मुंबईत नेमकं काय होणार याची उत्सुकता मतदारसंघातील नागरिकांना लागली आहे. विशेष म्हणजे कालच अपक्ष निवडून आलेल्या आमदारासाठीही एकनाथ शिंदेंनी हेलिकॉप्टर पाठवले होते. त्यानंतर, जुन्नर विधानसभा मतदार संघातून विजयी झालेले अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली होती. आता, आमदार संतोष बांगर यांच्यासाठी खास जेट थेट हैदराबादला पाठवण्यात आलं.विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सर्व आमदारांना तात्काळ मुंबईला बोलविले आहे. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे निवडून आल्यानंतर वैद्यकीय कामानिमित्त त्यांना तत्काळ हैदराबाद येथे जावं लागलं होतं.ते काम आटपून आमदार बांगर उद्या मुंबईला जाणार होते. परंतु, त्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी बांगर यांना घेण्यासाठी मुंबईवरून एक प्रायव्हेट विमान हैदराबाद येथे पाठवलं आहे. त्या विमानातून प्रवास करत आमदार संतोष बांगर यांना तत्काळ मुंबईला बोलवण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार आज सायंकाळी पाच वाजता आमदार संतोष बांगर त्या प्रायव्हेट जेटमध्ये बसून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. बांगर यांना एवढ्या घाई गडबडीत का बोलण्यात आले हे अजून समजू शकलेलं नाही. त्यामुळे, राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडामोडी सुरू आहेत याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये