ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रत्येक बहिणीला एक धनंजय ‘भाऊ’ पाहिजेच* ————-*बहिणीच्या विजयासाठी भावाची धावाधाव*

पाठलाग न्युज/परमेश्वर गित्ते:

प्रत्येक बहिणीला एक धनंजय ‘भाऊ’ पाहिजेच* ————-*बहिणीच्या विजयासाठी भावाची धावाधाव*

अंबाजोगाई : नात्याची गुंफण ही अधिक लवचिक आणि हळवी असते. सर्व नात्यांमध्ये बहिणभावाचे नाते हे अधिक पवित्र मानले जाते. या नात्यांमध्ये मायेची व प्रेमाची ऊब असते. तेवढाच हट्टीपणा, ताठरपणा आणि तेवढीच आपुलकी सुद्धा असते. गेल्या 39 वर्षांपासून हे नाते जपण्याचे काम पालकमंत्री ना. धनंजय मुंडे व माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केले आहे. परंतु सन 2011 च्या डिसेंबरपासून ते परवाच्या महायुतीच्या एकत्रितपणापर्यंत दुरावले होते. आता महायुती एकसंघ झाली असल्याने बहिणभाऊ सुद्धा एकत्र आले आहेत. दोन्ही राजकीयदृष्टया सक्षम आणि प्रभावी आहेत. असे असताना स्वतःचा ‘ इगो ‘ बाजूला ठेवून त्यांनी हे नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. पंकजाताई मुंडे या बीड लोकसभेच्या उमेदवार आहेत. तर धनंजय मुंडे हे कार्यकर्ता, प्रचारक, नेता आणि भाऊ म्हणून आपली भूमिका बजावत आहे. पंकजाताईंच्या विजयासाठी ना.धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यात प्रभावी प्रचारयंत्रणा राबविली आहे. शिवाय ‘जिथे कमी तिथे आम्ही’ प्रमाणे ना. धनंजय मुंडे हे आपले कर्तव्य निभावत आहेत. ना. धनंजय मुंडे यांना लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे राजकीय व सामाजिक ओळख मिळाली. ना. धनंजय मुंडे यांनीसुद्धा मिळालेल्या संधीचे सोने करत स्वतःचे नेतृत्व कर्तृत्वातून सिद्ध केले. ना. धनंजय मुंडे हे 1995 पासून सक्रिय राजकारणात व समाजकारणात आहेत. तर पंकजाताई मुंडे या 2004 पासून सक्रिय राजकारणात व समाजकारणात आहेत. परंतु 2009 साली पंकजाताईंनी विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर स्वतः धनंजय मुंडे 2010 साली विधान परिषदेच्या माध्यमातून सभागृहात पोहचले. तसे ना. धनंजय मुंडे हे 2002 च्या पट्टीवडगाव सर्कलमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झाले. ना. धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे या बहिणभावांनी आपले नाते जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची भूमिका त्यांनी सातत्याने घेतलेली आहे. मागच्या काळात कटूता होती तरी कधी सार्वजनिक व्यासपिठावरून अपशब्द वापरला नाही किंवा टीका-टिप्पणी केली नाही. उलट कामाच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली. 2011 पासून नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला. मध्यंतरी 03 जून 2014 साली लोकनेत्यांचे निधन झाले. त्यावेळी हा परिवार एकत्र येईल असे वाटत होते, मात्र त्यात यश आले नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे राष्ट्रवादीकडून उमेदवार होते. त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यांनी तो पराभव स्वीकारला आणि पुन्हा काम सुरू केले. पक्षाने त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद दिले. त्या पदाला ‘चार चाँद ‘ लावण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून झाला. तत्कालिन सरकारला घेरण्याची संधी त्यांनी सोडली नाही. 2019 साली पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे विरुद्ध पंकजाताई मुंडे असा सामना झाला. त्यावेळी मात्र पंकजाताई मुंडे यांचा 30 हजार मतांनी पराभव झाला. पराभवाचे शल्य पंकजाताईना होते. त्याच दरम्यान ना. धनंजय मुंडे यांच्यावर जिल्ह्याचे पालकमंत्री पद आणि राज्याचे सामाजिक न्याय व हक्क विभागाचे मंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. त्या काळात त्यांची उंची आणखी वाढली. कोरोनाच्या काळात उत्कृष्ट असे काम त्यांनी केले. आता राज्यातील राजकीय समिकरण बदलले आहे. भाजप,शिवसेना शिंदे गट व अजितदादांची राष्ट्रवादी हे सर्व एकत्र आले आहेत. हे असताना परळीत काय होईल? अशी चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होती. मात्र, बहिणभावांनी आपले सर्व वैचारिक मतभेद विसरून बीड जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येण्याची भूमिका घेतली. त्यातच पक्षानेसुद्धा पंकजाताई मुंडे यांची बीड लोकसभा उमेदवार म्हणून घोषणा केली. पंकजाताईंच्या उमेदवारीचे स्वागत करून स्वतः धनंजय मुंडे यांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली. आष्टीजवळील धामणगाव या ठिकाणी त्यांच्या स्वागताचा नेत्रदीपक असा सोहळा पार पडला. परळीला येईपर्यंत मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. एकूणच धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे हे बहिणभाऊ सुहृदयी आहेत. याची प्रचिती मागच्या काळात अनेक वेळा आलेली आहे.परंतु राजकीय भूमिका वेगळी असल्याने ते एकत्र येऊ शकले नाहीत. महायुतीने ही किमया घडवून आणली आहे.जसे राजकीय पक्ष विकासासाठी एकत्र आले आहेत. त्याचप्रमाणे हे बहिणभाऊ सुद्धा नात्याची गुंफन घट्ट करण्यासाठी एकत्र आले आहेत. पंकजाताईंच्या विजयासाठी ना. धनंजय मुंडे हे जीवाचे रान करत आहेत. बहिणीच्या विजयासाठी दिवसभरात राज्यातील प्रचार सभा आटोपून रात्री 10 च्या नंतर पहाटे 4 – 5 वाजेपर्यंत ठिकठिकाणच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना व पदाधिकार्‍यांना बोलावून आढावा घेतला जातो आहे. शिवाय जे काही प्रश्न व समस्या आहेत. त्याचे निराकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याच्या राजकारणातील व समाजकारणातील किंगमेकर आहेत. लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या कामाला त्यांनी जवळून पाहिलेले व अनुभवलेले आहे. त्याच मार्गावर चालण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आज पंकजाताई मुंडे यांच्या पाठिशी मोठा भाऊ म्हणून पालकाच्या भूमिकेत धनंजय मुंडे ठामपणे उभे ठाकले आहेत. शिवाय बीडच्या जाहिर सभेत त्यांनी मला पालक म्हणून व घरचा मोठा म्हणून सर्व जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी लागते. असे सांगून या नात्याची लवचिकता मांडली होती. तसे बहिणभावांमध्ये चार वर्षांचे अंतर आहे. ना. धनंजय मुंडे हे पंकजाताई मुंडे यांच्यापेक्षा चार वर्षांनी मोठेच आहेत. म्हणून वडील बंधू असलेले धनंजय मुंडे हे सतत बहिणीच्या विजयाची काळजी घेत आहेत. बोलतांना मोठा संयम आणि कुठलाही अनाठायी प्रश्न निर्माण होऊ नये याची ते काळजी घेत आहेत. नियोजनाच्या बाबतीत हे सरस ठरलेले आहेत. शिवाय एक खंबीर पाठीराखा भाऊ म्हणून सुद्धा ते आपली भूमिका चोखपणे पार पाडत आहेत. बहिणीच्या विजय हा ऐतिहासिक व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा चालवलेली आहे. महायुती म्हणून सर्वच पक्षांच्या नेत्यांना, पदाधिकार्‍यांना व कार्यकर्त्यांना समानतेची वागणूक देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. प्रत्येकाला समजून घेत पुढे चालण्याचा सल्ला ते देत आहेत. सुंदर असे नियोजन आणि आयोजन त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक बहिणीच्या पाठीशी एक धनंजय भाऊ असलाच पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये