बीड / प्रतिनिधी बालनाट्य स्पर्धांमूळे बाल कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. मोठ्या प्रमाणात रंगमंच उपलब्ध होत असल्याने रंगमंचाची जवळून ओळख होते. त्यामुळे रंगमंचावर कला सादर करत असतांना सहाजिकच भर पडत राहते. शासनाच्या सांस्कृतिक धोरणामुळे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी बीडमध्ये होत आहे, ही बाब कौतुकाची आहे. त्यामुळे बालनाट्य स्पर्धेचा बीडच्या रसिकांनी आनंद घेवून बाल कलाकारांना प्रोत्साहन द्यावे. असे आवाहन बीड जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी उदघाटनाप्रसंगी केलं. बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित २० वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी बीड केंद्रावर मंगळवार (दि.५) मार्च ते रविवार (दि.१०) मार्च या कालावधीत होत आहे. या बालनाट्य स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे बोलत होत्या. यावेळी सूर्यकांत ढगे, सचिन सातपुते, पत्रकार सुनिल डोंगरे,जेष्ठ नाटककार गोविंद गोडबोले, दिपक सरवदे, प्रा.केशव भागवत, प्रा. तन्मय शेटगार, परीक्षक रमेश थोरात, गजानन दांडगे, रमेश भिसीकर, ज्योती रावेरकर, डॉ. माणिक जोशी, बालनाट्य स्पर्धा बीड केंद्राचे समन्वयक मुकूंद धुताडमल, प्रविण निसर्गंध, प्रविण राठोड, दिनेश पाटोळे, अक्षय कोकाटे, अक्षय जाधव, वैभव निवारे, राम पडुळे, सोनू पवार, ऋषिकेश दाभाडे, प्रदीप मनोहर, शिव चव्हाण, अमोल सानप, सतीश राठोड आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे म्हणाल्या की, नाट्य चळवळ टिकून रहावी, यासाठी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून बालनाट्य स्पर्धा होत आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार,सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आयोजित असून या बालनाट्ये स्पर्धेस त्यांनी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत बालकलावंतांनी व रसिक प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या बालकलावंतांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी केलं.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.