Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*महाराष्ट्र गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन व पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने बीड जिल्ह्यातील नोंदणीकृत गोशाळांना नोंदणी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

*महाराष्ट्र गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन व पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने बीड जिल्ह्यातील नोंदणीकृत गोशाळांना नोंदणी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न.

बीड प्रतिनिधी :- महाराष्ट्र गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ रोजी पशुसंवर्धन आयुक्त कार्यालय बीड येथे बीड जिल्ह्यातील एकूण ५३ नोंदणीकृत गोशाळांचे नोंदणी प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे शासकीय सदस्य श्री उद्धवजी नेरकर व डॉ. दिलीप मोरे यांच्या हस्ते सदर प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीने बीड जिल्ह्यातील गोशाळांना नोंदणी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन बीड शहरातील सुभाष रोडवरील पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयात करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी मा उध्दवजी नेरकर, सदस्य ,महाराष्ट्र गोसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य डॉ आर डी कदम, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त बीड डॉ दिलीप मोरे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन बीड , श्री बाजीराव ढाकणे,बीड जिल्हा समन्वयक, महाएनजिओ फेडरेशन, महाराष्ट्र राज्य डॉ देशपांडे यांच्यासह बीड जिल्ह्यातील गोशाळेचे संचालक यांची उपस्थिती होती. सर्व ५३ गोशाळा संचालकांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आली.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये