ताज्या घडामोडी

लोक न्यायालयात तात्काळ न्याय मिळाला व दुभंगलेली                                                   मने लोकन्यायालयामुळे पुन्हा जुळूनआली

पाठलाग न्युज/प्रतिनिधी:

वृद्ध महिलेस लोक न्यायालयात तात्काळ9 न्याय मिळाला व दुभंगलेली

                                                  मने लोकन्यायालयामुळे पुन्हा जुळूनआली

बीड,दि.30(जि.मा.का.):महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरून व मा.श्री हेमंत शं.महाजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज 30 एप्रिल 2023 रोजीजिल्हाविधीसेवा प्राधिकरण बीडच्या वतीने बीड जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक न्यायालयाततिनकुटुंबांचे संसार पुन्हा जळून दुभंगलेली मने परत सांधण्यातव त्यांचेसंसारपुन्हासावरण्यातलोकन्यायालयाचीशिष्टाईयशस्वी झाली. मा. सह दिवाणीन्यायाधीशव. स्तर श्री. ए .एन .पठाण यांच्या पॅनलवरील एका प्रकरणात मुले वआई दरम्यान असलेल्या वडिलोपार्जित जमिनीच्या वादात लोक न्यायालयाने यशस्वी मार्ग काढला. यावेळी सर्व सहमतीने सरस निरस वाटप करून वृद्ध मातेसह दोन्ही मुलांचे समाधान होईल असा निर्णय देत सर्वांना विशेषतः 85 वर्षे महिलेला तात्काळ न्याय देण्यात आला. तर मा. कौटुंबिक न्यायालयातील तिनप्रकरणातमा. जिल्हा न्यायाधीश क्र. 6, श्री. के. आर. जोगळेकर मा.कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक श्रीमती नागभिडे यांनी समोपचाराने तीन संसार परत जुळवले. पैकी एक दावा पोटगीचाहोता तर उर्वरीत दोन प्रकरणे ही आपसातील वादावरूनमा. कौटुंबिक न्यायालयात दाखल केले होते . या दोन्ही बाबतीत लोक न्यायालयात यशस्वी तडजोड झाल्याने हे संसार परत जुळून आले. बीड शहरातील एका प्रकरणात उभयपक्षकारहे 35 वर्षांपूर्वी परिणय बंधात बध्दहोते. त्यांच्या संसार वेळेवर तीन फुलेफुलल्यानंतरत्यांच्यात बारीक-सारीक कुरबुरी होऊ लागल्या व परिणामी प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले. साडेतीन दशकांच्या सहवासानंतर त्यांच्या संसाराला लागू पाहणारे ग्रहण न्यायालयाचे शिष्टयाने दूर झाले. वय वर्ष 58 व 55 वर्षे असतानाही न्यायालयाच्या पायरीवर पोहोचलेल्या दांपत्यास पुन्हा परत एकत्र आणण्यात लोकांन्यायालयाला यश आले. यावेळी मा न्यायाधीशव लोक न्यायालयाचे पॅनल सदस्यायांनीदोन्ही बाजूंची समजूत काढून उभयपक्षकारांमधील वाद मिटवून त्यांचे संसार जुळवीत यशस्वी तोडगा काढला. सदरील लोक न्यायालयाच्या प्रसंगी मा. श्री. सिद्धार्थना.गोडबोले सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्यासह मा.श्रीमती. एस. आर . पाटील जिल्हान्यायाधीश – 1, मा. श्री. एस. टी. डोके जिल्हा न्यायाधीश- 5, मा. श्रीमतीएस. एस. पिंगळे दिवानी न्यायालय व . स्तर, मा. श्रीमती एफ.बी.बेग मुख्य न्यायदंडाधिकारी, वकील संघाचे अध्यक्ष मा. श्री .एस. एम. नन्नवरे, सर्व सरकारी अभियोक्ता, पॅनलविधिज्ञ, न्यायालयीन अधिकारीवकर्मचारी, बॅककर्मचारी, पोलीस कर्मचारीव इतर कार्यालयीन कर्मचारी यांची उपस्थित होती.

 

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये