केज तालुक्यातील देवगाव येथील जलजीवन मिशन योजनेच्या कामांचे कोट्यावधी रुपये पाण्यात.
केज : बीड जिल्ह्यातील देवगाव येथील जलजीवन मिशन योजनेचे २५ टक्केदेखील काम पूर्ण न झाल्याने या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देवगाव येथील बालासाहेब रामहरी मुंडे यांनी केल्यानंतर, ॐ कन्स्ट्रॅक्शन कंपनीने केलेल्या थातूर -माथुर कामाची उद्या दि. 21/2/25 रोजी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधीही चौकशीचे आश्वासन देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याबद्दल पुन्हा तक्रार देण्यात आली होती. बीड जिल्ह्यातील देवगाव येथील जलजीवन मिशन योजनेच्या कामांचे कोट्यावधी रुपये आता पाण्यात जाण्याची वेळ आली आहे. एकूण रु.33686000/- किंमतीच्या देवगाव जलजीवन मिशन योजनेचे २५ टक्के देखील काम पुर्ण न झाल्याने या कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी बालासाहेब रामहरी मुंडे यांनी केली आहे. देवगाव सह संपूर्ण बीड जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा उडाल्याची सर्वत्र परिस्थिती दिसत असतानाच केज तालुक्यातील देवगाव येथील जलजीवन मिशन योजनेच्या कामांचे कोट्यावधी रुपये पाण्यात.गेल्याचे चित्र आहे. झालेल्या कामांचा दर्जाही चांगला नसून याकडे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. सदरील कामाची चौकशी करून बोगस काम करणाऱ्या ॐ कॅन्स्ट्रॅकशन कंपनीला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.