बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंची गाडी आवडणार्या ५० मराठा आंदोलंकांवर गुन्हे दाखल.
केज: केज तालुक्यातील औरंगपुर येथे असलेल्या पावनधाम येथे तुकाराम बीज निमित्त दर्शनासाठी आलेल्या भाजपाच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मराठा आरक्षण समर्थक आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करून त्यांचा ताफा अडविल्या प्रकरणी सुमारे ५० ते ५५ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. दि. २७ मार्च रोजी दुपारी १:३० वा. च्या सुमारास भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे या केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंबाजोगाई-कळंब रोडवर असलेल्या औरंगपूर येथील पावनधाम येथे तुकारामबिज निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यांनी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतल्या नंतर त्या शेजारच्या सभा मंडपात मठाधिपती ह.भ.प. महादेव महाराज बोराडे यांचे सूरु असलेले कीर्तन ऐकण्यासाठी जात असताना मराठा आरक्षण समर्थक जमावातील कार्यकर्त्यानी त्यांना काळे झेंडे दाखवून एक मराठा लाख मराठा आशा घोषणा दिल्या. त्यामुळे तेथे काही काळ गोंधळाची व तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी घोषणाबाजी करणार्या कार्यकर्त्यानां प्रथम समजावण्याचा प्रयत्न केला परंतु,अक्रमक झालेल्या अंदोलकांवर सौम्य लाठीमार केला होता.त्या प्रकरणात युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे गोपनीय शाखेचे पोलीस शिपाई योगेश समुद्रे यांच्या फिर्यादी वरून जवळबन येथील दिपक दिगांबर करपे, गणेश विठठल करपे, शिवाजी ऊर्फ सतिष सुंदरराव करपे, संदीप अंकुश करपे, निलेश वसंत करपे, भैय्या संजय गायकवाड, अक्षय जनक करपे, अमोल श्रीराम करपे, अभिषेक अविनाश करपे, श्रीराम राजाभाऊ गायकवाड, नानासाहेब राजाभाऊ मोरे, बालासाहेब बाबासाहेब रंदवे, प्रशांत शिवाजी करपे, विकास राजाभाऊ करपे, ओमकार दत्तात्रय करपे, राहुल श्रीराम करपे, विकास बाबुराव करपे, अमोल शिवाजी करपे तसेच कैलास चव्हाण (रा. पळसखेडा), मधुकर साखरे (रा. कानडी बदन), योगेश संभाजी मस्के आणि सचिन मस्के दोघे रा. सावळेश्वर, गोविंद बालासाहेब गायकवाड आणि रवि गायकवाड दोन्ही (रा. आनंदगाव) या चोवीस जणांसह इतर २५ ते ३०अशा ५० ते ५५ जणांच्या जमावांनी मा. जिल्हा दंडाधिकारी यांच्या महाराष्ट्र पोलिस कायदा जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचे गाडीचे समोर येऊन मराठा आरक्षणाच्या मागणीचे संदर्भाने एक मराठा; लाख मराठा; आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच ! अशा घोषणा दिल्या.व गाडी अडवण्याचा प्रयत्न केला आणि,जमावाने जिल्हा दंडाधिकारी यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लघंन केले म्हणुन त्यांच्या विरुध्द गु र नं ७२/२०२४ भा दं वि ३४१, ३४३, १४७, १४९, १८८ महाराष्ट्र पोलीस कायदा १३५ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार रामधन डोईफोडे हे तपास करीत आहेत.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.