ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जीवाचीवाडीसह परिसरात खुलेआम अवैध दारूचा हैदोस! … महिला सरपंचाच्या तक्रारीवर परीसरात दारुचा थेंबही नसल्याचा पोलिसांचा पंचनामा!!

पाठलाग न्युज/अप्पाराव सारुक:

जीवाचीवाडीसह परिसरात खुलेआम अवैध दारूचा हैदोस! … महिला सरपंचाच्या तक्रारीवर परीसरात दारुचा थेंबही नसल्याचा पोलिसांचा पंचनामा!!

सरपंच,प्रेरणा काळे

येवता : केज तालुक्यातील जीवाचीवाडी व परिसरात खुलेआम बेकायदा सर्व प्रकारच्या देशी-विदेशी व खावटी दारु विक्रीचा हैदोस माजल्याने परिसरातील तरुणाई वेसनाधिन होत असल्याची तक्रार एका जबाबदार महिला सरपंचाने पोलीस अधीक्षक यांचेकडे केलेली असतांना केज पोलिसांनी मात्र तक्रारसद्रश्य परिसरात दारुचा थेंबही मिळत नसल्याचा निर्वाळा दिला असल्याची महीती समोर आली आहे. याबाबत अधिक माहीती अशी की, केज तालुक्यातील जीवाचीवाडी,तुकूचीवाडीसह परीसरात विना-परवाना देशी-विदेशी बनावट दारू खुले आम विक्री होत असलेचे लेखी निवेदन व ग्राम पंचायतच्या ठरावाच्या सत्यप्रती गावच्या प्रथम नागरीक तथा महिला सरपंच,श्रीमती प्रेरणा दिपक काळे व ग्रामपंचायत,जीवाचीवाडीचे पद्राधिकारी व दोन्ही गावातील महिला यांनी पुढाकार घेऊन पोलीस अधिक्षक,बीड.यांना ०२ऑगष्ट-२०२४ रोजी प्रत्यक्षात पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन ठरावासह निवेदन दिलेले आहे.सदर निवेदनाच्या प्रती विभागीय पोलीस आयुक्त कार्यालय,छत्रपती संभाजीनगर. तहसीलदार,केज.अप्पर पोलीस अधिक,अंबाजोगाई.पोलीस उपाधिक्षक,केज.अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क,बीड.पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे,केज.यांना एक महिन्यापूर्वी दिलेले असतांना अद्याप कसलीच कारवाही झालेली नाही. विनापरवाना देशी- विदेशी बनावट दारू विक्री रोखण्यास सबंधीत नियंत्रण विभाग अपयशी ठरलेला असून ना.पालकमंत्री धनंजय मुंडे यांनाही एका कार्यक्रमात निवेदन देऊनही दारु विक्री रोखन्यास पोलीस यंत्रणा पुर्णतःअपयशी ठरली असल्याचे स्पष्ट आहे.या बाबत विडा बिट चे पोलीस सहाय्यक उपनिरिक्षक राजु वाघमारे यांचेशी संपर्क केला असता त्यानी आमच्या प्रतिनिधिशी बोलतांना सांगितले की, जिवाचीवाडी व परिसरात आपण प्रत्यक्ष भेट दिली आसता परिसरात कोठेही अवैध दारु विक्री होताना आढळुन आली नसल्याचे आपन 3 ठिकानचे तसे पंचनामे करुन अहवाल वरिष्ठाना पाठवल्याचे सांगितले.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये