Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्राईम न्युजक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीयसंपादकीय

बीड जिल्ह्यात पोलीस आणि महसूल खात्याची लाचखोरी आघाडीवर. वर्ष 2024 या वर्षभरात २८ लाचखोरावर गुन्हे दाखल.

पाठलाग न्युज/बीड:

बीड जिल्ह्यात पोलीस आणि महसूल खात्याची लाचखोरी आघाडीवर.

वर्ष 2024 या वर्षभरात २८ लाचखोरावर गुन्हे दाखल.

बीड /प्रतिनिधी: लाच देणे आणि घेणे हा कायद्याने गुन्हा असला तरी, प्रशासनामध्ये असलेल्या लोकसेवकांकडून वर्षभरामध्ये लाच घेण्याचे अनेक गुन्हे घडले असून, यामध्ये महसूल आणि पोलीस खाते सर्वात पुढे असल्याचे 2024 या वर्षभरातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्याकारवाईतून पुढे आले आहे. वर्षभरात जवळपास २८ लाचखोरांना ताब्यात घेण्यात आले असून, लाच लुचपतीच्या आरोपाखाली २९ गुन्हे दाखल आहेत: तर यातील लाचेची रक्कम ही २५ लाख ४५ हजार रुपये एवढी असल्याची माहिती बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी शंकर शिंदे यांनी पाठलाग शी बोलताना दिली. शासकीय कामकाजामध्ये अनेक ठिकाणी लाचेचे प्रकार शासकीय कर्मचाऱ्याकडून लाच घेण्याचे प्रकार घडत आहेत. अनेक वेळा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग या संदर्भात प्रमुख कार्यालयात दर्शनी भागावर बोर्ड लावले जात आहेत, शिवाय अनेक वेळा तक्रारी करण्याचे आवाहन केले जात आहे. लाचेची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याची अर्थात लोकसेवकाची आमच्याकडे तक्रार करा,याबरोबरच कोणीही लाच देऊ नये किंवा घेऊ नये असे आवाहन केले जात असले तरी, प्रामुख्याने लाच देण्या -घेण्याचे प्रकार घडतच आहेत. जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ या एका वर्षाच्या कार्यकाळामध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून मोठ्या प्रमाणातकारवाया केल्या आहेत.लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांनी संपणाऱ्या वर्षभरात दिलेल्या माहिती वरून या विभागाने आतापर्यंत एकूण ५८ आरोपी विरुद्ध २९ गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये महसूल विभागातील एकूण सात गुन्हे आहेत, यात १२ आरोपींना अटक केली आहे.त्यामध्ये १२ लाख रुपयाची एकूण राज्याची रक्कम आहे. जिल्हा परिषद व शिक्षण विभागांमध्ये दोन गुन्हे घडले असून पाच आरोपींना अटक केली आहे. पोलीस विभागांमध्ये सर्वाधिक १५ आरोपींना अटक केली असून, यामध्ये सहा गुन्हे दाखल असून, त्यांच्याकडून आठ लाख तीस हजार रुपये एवढ्या लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे. पाटबंधारे विभागामध्ये दोन गुन्हे असून, दोन आरोपींना ३१ हजार रुपयाची लाच घेताना ताब्यात घेतल आहे.नगररचना विभागांमध्ये तीन गुन्हे दाखल असून, यात सात आरोपी आहेत. यामध्ये लाचेची रक्कम दोन लाख तीस हजार रुपये एवढी रक्कम जप्त करण्यात आलीआहे.राज्य परिवहन महामंडळामध्ये एक गुन्हा दाखल असून, यामध्ये एका आरोपीने ३० हजार रुपये लाचेची मागणी केल्याची यामध्ये नोंद आहे. शिक्षण विभागामध्ये तीन गुन्हे दाखल असून, यात सात आरोपी असून, या गुन्ह्यात तीस हजार रुपये लाचेची रक्कम जप्त केली गेली आहे. विद्युत महामंडळामध्ये दोन गुन्हे दाखल असून, या तीन आरोपी वर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये ३१ हजार रुपये लाखेची रक्कम जप्त करण्यात आली आहे. सहकार विभागामध्ये केलेल्या कारवाईत एकूण तीन गुन्हे दाखलअसून, यात सहा आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, लाचेची रक्कम एक लाख पंचावन्न हजार रुपये एवढी रक्कम जप्त करण्यात आलीआहे. यासोबतच २०२४ मध्ये उघड चौकशी करून पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे व त्यांच्या बहाद्दर टीमने दोन अपसंपदा हेड्स खाली गुन्हे दाखल करून त्यांच्याकडे प्रत्येकी तीन कोटी दोन लाख ६४ हजार अपसंपदा निष्पन्न झाली असल्याची माहिती बीड लाचलुतपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक शंकर शिंदे यांनी पाठलागला दिली.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये