Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संच मान्यतेपेक्षा ज्यादा कर्मचारी भरती केलेल्या जळगाव जिल्ह्यात 154 शाळांची वेतन बीले रद्द ! शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीला एस आय टी कडून मोठी गती. बीड जिल्ह्यातील परळी चे वैद्यनाथ विद्यालय’ एसआयटी’च्या रडारवर!

पाठलाग न्यूज / क्राइम प्रतिनिधी:

संच मान्यतेपेक्षा ज्यादा कर्मचारी भरती केलेल्या जळगाव जिल्ह्यात 154 शाळांची वेतन बीले रद्द !

शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीला “एस आय टी’ कडून मोठी गती.

बीड जिल्ह्यातील परळी चे वैद्यनाथ विद्यालय’ प्रथमदर्शी  एसआयटी’च्या रडारवर!

क्राईम प्रतिनिधी : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात जळगाव जिल्हा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, या प्रकरणात शिक्षण विभागाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे, तर बीड जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये संच मान्यतेपेक्षा अधिक कर्मचारी भरती करून बनावट शालार्थ आयडी च्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या अनेक शिक्षण संस्था एसआयटीच्या चौकशीत उघड्या होत असल्याचे चित्र आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की,बनावट व संशयास्पद शालार्थ आयडीच्या आधारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेतन बिले सादर केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील तब्बल १५४ शाळांची वेतन बिले तात्काळ रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही खासगी अनुदानित शाळांमध्ये नियमबाह्य पद्धतीने बनावट शालार्थ आयडी तयार करून त्याआधारे वेतन उचलले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याआधारे शिक्षण संचालनालय तसेच संबंधित यंत्रणांनी तपास सुरू केला. तपासात अनेक शाळांमध्ये नियुक्ती प्रक्रियेत अनियमितता, मंजूर पदांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना वेतन, तसेच अस्तित्वात नसलेल्या किंवा नियमबाह्य शिक्षक-कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यात देखील परळी येथील वैजनाथ विद्यालयातील प्रभारी मुख्याध्यापकाने कर्मचाऱ्यांची वेतन बिले दाखल करताना संच मान्य तेतील मंजूर पदापेक्षा कितीतरी अधिक पदे , बोगस पद्धतीने भरल्यामुळे आणि बोगस शालार्थ आयडी नोंदवल्यामुळे कर्मचाऱ्यांची वेतन बीले अपलोड होत नसल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे केल्यामुळे , बीड जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळ्याला तोंड फुटले असल्याची चर्चा आहे. या गंभीर आर्थिक गैरव्यवहारामुळे शासनाच्या तिजोरीवर मोठा बोजा पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, प्राथमिक तपास पूर्ण झालेल्या जळगाव जिल्ह्यातील १५४ शाळांच्या वेतन बिलांवर तत्काळ स्थगिती आणण्यात आली आहे. संबंधित शाळांना पुढील आदेश होईपर्यंत कोणतेही वेतन अदा करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे संबंधित शाळा व्यवस्थापन, संस्था चालक आणि काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही संशयाची सुई फिरू लागली आहे. शिक्षण विभागाकडून आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असून, दोषी आढळणाऱ्या संस्था चालक, मुख्याध्यापक तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. तसेच, शासनाची निधी गैरमार्गाने उचलल्याचे सिद्ध झाल्यास वसुलीची कारवाईही होणार आहे. दरम्यान, वेतन बिले रद्द झाल्यामुळे प्रामाणिक व नियमबद्ध शिक्षक-कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. “घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी; मात्र निर्दोष शिक्षकांचे वेतन रोखले जाऊ नये,” अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे. तसेच बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे संपूर्ण राज्यात शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, जळगावमधील ही कारवाई इतर जिल्ह्यांसाठीही इशारा मानली जात आहे. या प्रकरणाचा अंतिम अहवाल आणि पुढील कारवाईकडे आता संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये