क्राईम न्युजग्रामीण वार्तामहाराष्ट्रसंपादकीय

सीआयडीच्या अप्पर पोलीस महासंचालकांची केज ला भेट. सरपंच हत्या प्रकरणाचा तपास गुप्तहेरांकडून चालू!! मीडियाला माहिती देण्याचे सीआयडी पथकाने टाळले!

पाठलाग न्यूज / क्राईम प्रतिनिधी :

सीआयडीच्या अप्पर पोलीस महासंचालकांची केज ला भेट.

सरपंच हत्या प्रकरणाचा तपास गुप्तहेरांकडून चालू!!

मीडियाला माहिती देण्याचे सीआयडी पथकाने टाळले!

केज : संपूर्ण महाराष्ट्राच्या गुन्हेगारी आणि राजकीय क्षेत्राला घुसळून टाकणाऱ्या केज तालुक्यातील मसाजोग सरपंच हत्या प्रकरणाचा तपास गुप्तहेरांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिल्यानंतर काल प्रथमच गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक व त्यांच्या टीमने केज येथे भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. दरम्यान हत्या व खंडणी प्रकरणाचा तपास हा सीआयडी म्हणजेच गुप्त पद्धतीने केला जात असल्यामुळे सीआयडीच्या पथकाने मीडिया किंवा आरोपात्मक चर्चा करणाऱ्यांची भेट व चर्चा टाळली असून, जेणे करून आरोपी हे दूरावण्यात व जागृत होण्यात  सतर्क होणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून काढून घेऊन, सीआयडी कडे सोपविण्यात आला असल्याने या प्रकरणातील तपासाची सुत्रे वेगाने हलवली जात आहेत. दरम्यान या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे, पुणे येथील सीआयडीचे पोलिस महानिरीक्षक बस्वराज तेली, पुणेसीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत हे काल दि.२६ रोजी गुरुवारी दिवसभर केज मध्ये तळ ठोकून होते. दरम्यान दुपारी दीड वाजेपासून सायंकाळी साडेचार ते पाच बाजेपर्यंत केज येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी बैठक घेतली आणि प्रकरणाची इत्यंभूत माहिती घेतली. या प्रकरणाच्या तपासाबाबत पत्रकारांना अधिक माहिती देण्याचे टाळले.कारण हा गुप्त तपासाचा भाग असून, कुठल्याही परिस्थितीत आरोपी ताब्यात घेणे व लपवण्यात आलेली माहिती आत्मसात करणे हा सीआयडी तपासाचा हेतू असतो.त्यामुळे या प्रकरणातील  अधिक माहिती मिळेल या आशेने आलेले सर्वच मिडियाचे प्रतिनिधी, चैनल्सवाले यांना आल्या पावली परतावे लागले. सीआयडी पथकाने मस्साजोगला देखील भेट देण्याचे टाळले. त्यामुळे गावकरी व अत्याचारग्रस्त कुटुंबिय नाराज झाले आहेत. दरम्यान असे असले तरीही या प्रकरणाच्या तपासाबाबत सीआयडी पथकाने घेतलेली भूमिका तपासाच्या दृष्टीने व आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याच्या दृष्टीने योग्यच असल्याची परिस्थिती असल्यामुळे सीआयडी चे अधिकारी आरोपींना अटक कधी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये