संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी “केज बंद” ची पुन्हा हाक!! मागण्या मान्य होईपर्यंत आमचा “टाहो” तेवत राहणार . —प्रा.भोसले.
केज: केज शहरातील व्यापाऱ्यांच्या जागेचा गंभीर प्रश्न तात्काळ सोडवावा, केज येथे राज्यपरिवहन मंडळाचा बसडेपो (आगार) तात्काळ सुरू करा, लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यगृहाचे काम लवकर सुरू करा आणि श्रावणबाळ व संजय गांधी योजनेअंतर्गत तालुका समित्यांच्या बैठकाअभावी रखडलेले नवीन पात्र लाभार्थ्याचे अर्ज तात्काळ बैठका घेऊन मंजूर करा या तीन महत्वाच्या मागण्या घेऊन केज विकास संघर्ष समितीने पुन्हा एकदा केज बंदची हाक दिली असून,सतत पाठपुरावा करूनही तालुका प्रशासनाने त्याकडे गंभीरतेने लक्ष दिले नाही याकरिता येत्या बुधवारी दि. 26 जुलै रोजी केज शहरातील व्यापारी व जनतेच्या सहभागाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन केज विकास संघर्ष समितीने केले आहे.
या बाबत केज तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, केज शहरातील अनेक समस्या अद्याप प्रलंबित आहेत. आंदोलने करुनही महत्वाच्या समस्या वेळेत सुटत नाहीत हे केजकरांचे दुर्दैव आहे. खरे पाहता सततची निवेदने व आंदोलने शासन व समाजासाठी योग्य नाहीत. मात्र अशी आंदोलने केल्याशिवाय आजपर्यंत प्रशासनाने आमच्या समस्यांची कधीच दखल घेतलेली नाही. आम्ही कोणतेही काम आम्हाला वाटेल तेंव्हा करू ते मान्य करा अशीच जणू प्रशासनाची भूमिका आहे. म्हणूनच जी कामे शहरात पंधरा वर्षा पूर्वी व्हायला हवी होती तीच प्रलंबित कामे इतक्या उशिरा का होईना होत असल्याचा आम्हास आनंद आहे. या साठी आम्ही लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे आभार मानत आहोत.यातील व्यापाऱ्यासाठी जागेचा प्रश्न, केज येथे बस डेपो मंजुरी आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यगृहाचे काम लवकर सुरू करावे या तीन प्रमुख मागण्यासह इतर मागण्यां लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तात्काळ सोडवाव्यात या यासाठी येत्या बुधवार दि 26 जुलै रोजी “केज बंद” चे आयोजन करण्यात आले आहे. हा बंद पूर्णतः अराजकीय असून तो जनतेचा बंद म्हणून घोषित केलेला आहे. बंद च्या दिवशी कोणालाही सक्ती केली जाणार नाही. ज्यांना वरील प्रश्न केजच्या विकास व प्रगतीचा भाग वाटतो अशा युवक व नागरिकांनी हा बंद यशस्वी करण्यासाठी मदत करावी.असेही केज संघर्ष समितीने आवाहन केले आहे. हा बंद यशस्वी करण्याची जबाबदारी केजवासीयांची आहे. विशेषतः केजच्या युवकांनी या अराजकीय आंदोलनाला यशस्वी करावे. केज विकास संघर्ष समिती ही केजच्या समस्या सोडवण्यासाठीचे माध्यम आहे. याबाबत आम्ही केज व्यापारी महासंघाला या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी विनंती केलेली आहे. आमच्याच व्यापारी बांधवांचे अधिकचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून हे केज बंद आंदोलन दुपारी 2 वाजेपर्यंतच असणार आहे. प्रशासनाला या समस्यांची गंभीरता लक्षात यावी म्हणून केजकरांच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला आहे. या केज बंद आंदोलना नंतर केजचे एक शिष्टमंडळ मुंबईला जाऊन मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्याची प्रत्यक्ष भेट घेऊन समस्या सोडवण्याबद्दल प्रयत्न करणार आहे. तरी केज शहरातील युवक-युवती व नागरिकांनी बुधवारचे केज बंद आंदोलन पूर्णतः यशस्वी करण्याचे आवाहन केज विकास संघर्ष समितीने केले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.