Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षण क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांशी संगणमत करून स्वतःची आर्थिक पोळी भाजून घेणारे ३६ संस्थाचालक पोलिसांच्या रडारवर. ” येतो सिर्फ झाकीहै,मराठवाड्यातील बीड जिल्हा बाकी है”!

Pathlag News.

शिक्षण क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांशी संगणमत करून स्वतःची आर्थिक पोळी भाजून घेणारे ३६ संस्थाचालक पोलिसांच्या रडारवर.

” येतो सिर्फ झाकीहै,मराठवाड्यातील बीड जिल्हा बाकी है”!

प्रतिनिधी: राज्यातील्या शिक्षण विभागातीला मोठा घोटाळा उघडकीस आल्याने नागपूर विभागातील ३६ शिक्षण संस्थाचालक आता पोलिसांच्याsitच्या रडारवर असल्याची माहिती समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात पुन्हा खळबळ उडाली आहे. दरम्यान, अधिकारी व संस्थाचालकांच्या संगनमतातून सातशेहून अधिक नियमबाह्य शालार्थ आयडी वितरित करण्यात आले असल्याचे समोर आले आहे.ज्यांना स्वतःचे नाव व्यवस्थित लिहता येत नाही आणि विध्यार्थ्यांना शिकवणे तर दूरच अशा शिक्षकांची संस्थाचालकांनी शाळांमध्ये नियुक्ती करवून शासनाचे वेतन बेकायदेशीर पद्धतीने चालू करवून घेतल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकारामुळेच दहावी-बारावीच्या निकालांत नागपूरचा क्रमांक मागील काही वर्षांपासून खालीच असल्याचे आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात कॉपीचा सुळसुळाट पाहवयास मिळत आहे. मुळात याला शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षण संस्थाचालक मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असल्याची बाब तपासातून समोर आली आहे.अपात्र मुख्याध्यापक नियुक्तीच्या प्रकरणात पोलिसांनी भंडारा येथील शिक्षण संस्थाचालक चरण चेटुले याला अटक केली व त्यानंतर केवळ मुख्याध्यापकच नव्हे, तर शिक्षण संस्थाचालकदेखील यात सहभागी असल्याचे समोर आले आहे.पोलिसांनी या गुन्ह्यासोबतच अपात्र शालार्थ आयडीच्या गुन्ह्यातदेखील सखोल तपास केला आहे. आतापर्यंत तीन उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांच्यासह दोन्ही गुन्ह्यांत १८ जणांना अटक झाली असून,त्यांच्या चौकशीतून अनेक मोठे खुलासे झाले आहेत. यातूनच पोलिसांना नागपूर विभागातील नमुन्यादाखल ३६ शिक्षण संस्थाचालकांची नावे मिळाली आहेत. या सर्व शिक्षण संस्थाचालकांनी मागील अनेक वर्षांपासून ‘अर्थपूर्ण’ व्यवहार करत पात्रता आणि क्षमता नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती करवून घेतल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. बेकायदेशीर नियुक्त करून घेतलेल्या शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे प्रशासनातील अधिका-यांच्या मदतीने त्यांचे बोगस शालार्थ आयडी तयार करून त्यांचे वेतन सुरू करवून घेतल्याचे उघड झाले आहे . हे सर्व संस्थाचालक आता एसआयटीच्या रडारवर आहेत. त्यांच्यासह शिक्षणसंस्थांचे सचिव, मुख्याध्यापक यांच्यावरदेखील लवकरच मोठी कारवाई होण्याच्या हालचालींना वेग आल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला सायबर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात ५८० जणांचे शालार्थ आयडी नियमबाह्य पद्धतीने तयार केल्याचे समोर आले होते. मात्र एसआयटीने केलेल्या तपासात हा आकडा आता वाढला आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालय, शिक्षणाधिकारी किंवा छाननी समितीसमोर कुठलाही प्रस्ताव न देता ६८१ जणांचे शालार्थ आयडी प्राप्त करण्यात आल्याचे चौकशीतून समोर आले आहे. या “एज्युकेशन स्कॅम” मध्ये मंत्रालयापासून ते शिक्षणसंस्था चालकांपर्यंतची मोठी साखळी आहे. नवीन शैक्षणिक सत्राचा सारासार विचार करुन एसआयटीकडून विविध मार्गांनी या घोटाळ्याचा तपास करण्यात येत आहे. त्यामुळे नियमबाह्य शालार्थ आयडीप्रमाणेच अपात्र शिक्षक, एज्युकेशन स्कॅम मध्ये सहभागी असलेले संस्थापक, संस्थेचे सचिव, अध्यक्ष व मुख्याध्यापक यांची यादीदेखील वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ६८१ शिक्षकांना लवकरच प्रत्यक्ष चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे. त्यातून या एज्युकेशन स्कॅममध्ये आणखी कोण सहभागी आहे, हे नव्याने समोर येणार आहे. नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर पूर्व विदर्भासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याच्या शालेय क्षेत्राला मोठे हादरे बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, संपूर्ण राज्यासाठी अशाच प्रकारची स्ट्रॉंग एसआयटी नेमून शिक्षणाच्या कळ्या बाजाराची चौकशी करण्याची मागणी माजी शिक्षण मंत्री, खासदार व शिक्षक आमदार यांनी केली आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात ‘”एज्युकेशन स्कॅम” चांगलाच गाजणार असल्याचे संकेत शिक्षक आमदारांनी दिले आहेत.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये