Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बीड जिल्ह्यातल्या शिक्षण विभागातल्या कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराला अखेर वाचा फुटली. शिक्षण अधिकारी शिंदे फुलारींच्या चौकशीचे आदेश. शिक्षण विभागातल्या सर्व चौकशा पूर्ण होईपर्यंत दोघांच्याही बदलीवर शासनाचा ब्यान. शिक्षण आयुक्त करणार भ्रष्टाचाराची चौकशी.

पाठलाग न्यूज / मुंबई:

बीड जिल्ह्यातल्या शिक्षण विभागातल्या कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराला अखेर वाचा फुटली.

माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे व प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी.

शिक्षण अधिकारी “शिंदे -फुलारीं”च्या चौकशीचे आदेश.

शिक्षण विभागातल्या सर्व चौकशा पूर्ण होईपर्यंत दोघांच्याही बदलीवर शासनाचा ब्यान.

शिक्षण आयुक्त करणार भ्रष्टाचाराची चौकशी.

मुंबई: नागपूरच्या शिक्षण विभागातील कर्मचारी भरती, शालार्थ आयडी घोटाळा व सरकारच्या तिजोरी वरील बेकायदेशीर वेतन दरोडा आदी घोटाळ्यांपेक्षाही महाभयंकर घोटाळा बीड जिल्ह्याच्या शिक्षण विभागात करण्यात आलेला असून, सदरच्या कोट्यावधींच्या घोटाळ्यात जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे माध्यमिक व प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, त्यांच्यावर नियंत्रण असलेले उपविभागी शिक्षण उपसंचालक आणि वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याने प्रशासनातल्या या सर्व फॅक्टरसनी संस्थाचालकांशी संगणमत करून, कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने शिक्षण आयुक्तांना दिले आहेत. दरम्यान कोट्यावतींच्या या भ्रष्टाचारात सामील असलेल्यांची पाचावर धारण बसली असून बीड जिल्ह्याच्या शिक्षण विभागातील भ्रष्टाचार व गैर कारभाराची नागपूरच्या धरतीवर पोलीस व शासनाची एसआयटी नेमून, शिक्षण आयुक्तांच्या नियंत्रणाखाली सखोल चौकशी करण्यात यावी अशी ही मागणी सर्व स्तरातून करण्यात आली आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, बीड जिल्ह्यात 2012 पासूनच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीवर ब्यान असल्याने 2019 पर्यंत करण्यात आलेली बेकायदेशीर भरती आणि गेल्या तीन वर्षात देखील मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी भरती करण्यात आली. सदरच्या बोगस भरतीसाठी बीड जिल्ह्यातल्या अनेक संस्थाचालकांनी उपसंचालक कार्यालयापासून ते मंत्रालय पर्यंत फिल्डिंग अधिकाऱ्यांच्या संगनमताने त्यांचे बोगस शालार्थ आयडी तयार करून शासनाच्या तिजोरीवर वेतनासाठी डल्ला मारण्यात आलेला आहे यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रस्तुत घोटाळ्यात बीडच्या दोन्ही शिक्षणाधिकारी यांनी घातलेला धुमाकूळ मात्र आता उघडकीस आला आहे. बीडचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे आणि प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी या दोघांनी या घोटाळ्यात प्रत्येकी चारशे ते पाचशे कोटी कोटी रुपयांची माया जमवली असल्याची तक्रार समोर आल्यानंतर या प्रकरणी राज्य शासनाने शिक्षण आयुक्ताना चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत या दोघांची बदली करू नये असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता या दोघांसोबत संस्थाचालक यांची देखील पाचावर धारण बसली आहे. बीड जिल्ह्यात बहुतांश खाजगी शाळांमध्ये 2012 ते 2019 या काळात नोकर भरतीवर बंदी असूनही मोठ्या प्रमाणात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भरती करण्यात आली आहे . संस्थाचालकांनी या काळात शिक्षक आणि कर्मचारी आपल्या शाळेवर नोकरीस असल्याचे खोटे कागदपत्र तयार करून एका सेवानिवृत्त शिक्षणाधिकाऱ्याची मागील तारखेत मान्यता घेऊन 2019 ते 2024 या काळात मोठ्या प्रमाणात भरती केली असल्याचे समोर येत आहे. बीडचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिक चे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी मागील तारखेतील रजिस्टर वापरून त्या- त्या काळातील शिक्षणाधिकारी यांच्या सह्या मॅनेज केल्या आहेत. ही प्रोसेस करताना कागदोपत्री बोगस पुरावे नोंद करून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झालेला आहे. बीड जिल्ह्यातील सगळ्याच संस्थांना शेकडो शिक्षक आणि कर्मचारी भरती करण्यासाठी अर्थपूर्ण व्यवहार झालेले आहेत, आणि या व्यवहारात दोन्ही शिक्षण अधिकाऱ्यांनी आपले हात धुवून घेतले आहेत. हा भ्रष्टाचार सही सलामत करण्यासाठी अनेक संस्थाचालक यांनी संभाजीनगर चे कार्यरत शिक्षण उपसंचालक यांच्यापासून ते मंत्रालया पर्यंत यंत्रणा मॅनेज करण्याचा प्रयत्न केला असल्याचे उघड पुरावे समोर आहेत . शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी यांनी संगनमताने अनेक न्यायालयीन प्रकरणात न्यायालयाचे आदेश असतानाही न्यायालयाचा अवमान केलेला आहे.मात्र “अंधारात केलेलं पाप एक ना एक दिवस उजेडात येतच” या नीती प्रमाणे बीडमध्ये जो काही शिक्षक भरती घोटाळा झाला आहे त्याची तक्रार शासनाकडे पोहोचली आणि . त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्त यांना पत्र पाठवून प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी केलेल्या चारशे ते पाचशे कोटीच्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत या दोघांची बीडमधून इतरत्र कोठेही बदली करू नये, त्यांच्या उपस्थितीतच ही चौकशी झाली पाहिजे असे म्हटले आहे.आता आयुक्त कार्यालयाकडून याबाबत चौकशीसाठी पथक पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर फुलारी आणि शिंदे यांच्यासहित ज्या ज्या संस्थाचालक यांनी काळे धंदे केले आहेत त्यांच्यावरील कारवाई निश्चित झाली आहे . बीड जिल्ह्यात जेवढा काही चारशे पाचशे कोटींचा घोटाळा झाला आहे त्याची चौकशी झाल्यास शिंदे, फुलारी आणि संस्थाचालक यांच्यासोबत बेकायदेशीर व बोगस नोकरीस लागलेले बोगस शिक्षक आणि कर्मचारी यांना देखील जेलची हवा खावी लागण्याची शक्यता आहे. नागपूर प्रमाणेच बीड जिल्ह्याच्या शिक्षण घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने, बीड जिल्ह्याच्या शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये