बनकरंजा उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा १०० टक्के तर, कला शाखेचा ९३ टक्के निकाल. निकालाची उज्वल परंपरा कायम.
केज : केज तालुक्यातील बनकरंजा माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय बनकरंजा येथिल विज्ञान व कला शाखेच्या बारावी वर्गाच्या विद्यर्थ्यांनी फेब्रुवारी महिण्यात दिलेल्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला असुन या प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षीही बनकरंजा उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीच्या विज्ञान शाखेचा १०० टक्के तर कला शाखेचा ९३ टक्के निकाल लागला असून या यशस्वी विद्यार्थ्यांच सस्थ च अध्यक्ष, सचिव, प्राचार्य प्राध्यापक व शिक्षक इतर कर्मचारी यांनी अभिनंदन करुण पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन. केज तालुक्यातील बनकरंजा उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के तर कला शाखेचा ९३ टक्के लागला असून, बारावी विज्ञान शाखा क्लास मधून चाटे प्रेरणा रत्नाकर हिने ८७.६७ टक्के मार्क्स घेत कॉलेज मधुन प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे, तर चव्हाण ऋषीकेश विजयकुमार याने ८४ टक्के मार्क्स घेऊन दुसरा वर्गातून दुसरा क्रमांक मिळवला आहे., कु.लांब वैष्णवी दत्तात्रय हिने ८३ टक्के मार्क्स घेऊन तीसरी आली आहे. तर कला शाखेतून देवकर तनुजा लक्ष्मण हीने ८०.६७ टक्के घेऊन कला शाखेतून कॉलेजमध्ये प्रथम आली आहे, सुरवसे निकिता बंडू ही ७९.३३ टक्के घेऊन द्वितीय आली आहे, घोंगडे युवराज निखिल हा ७८.८३ टक्के घेऊन -तिसरा आला आहे. या कॉलेजमधील विज्ञान व कला शाखेचे इतरही विद्यार्थी चांगले गुण घेऊन यशस्वी झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव सखाहारी (तात्या) गदळे, संस्थेंचे अध्यक्ष राहुल भैय्या गदळे, जयदत्त (भैय्या) दहिफळकर, बनकरंजा कॉलेजचे प्राचार्य चटपसर, मुंडे सर, बांगर सर, थळकरीसर, गायकवाडसर, वाघमारेसर, ठोंबरेसर, इतर प्राध्यापक मंडळींनी व शिक्षकांनी परिश्रम घेतले . कर्मचारी रविंद्र बाबर यांनीही आपली चोख भूमिका बजावली. सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांचे संस्थापक सकाहरी तात्या गदळे, संस्थेचे सचिव राहुल भैया गदळे यांनी सर्वांचे अभिनंदन करुण पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.