क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र
संस्थाध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापकांला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा निर्धार.
पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :


मराठवाडा : परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातील मंगरूळ येथील श्री नरसिंह प्राथमिक शाळेच्या सचिवाकडून आर्थिक फसवणूक आणि पिळवणूक केल्याप्रकरणी 35 वर्षीय शिक्षक सोपान पालवे यांनी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर संबंधित संस्थेचे सचिव बळवंत खळीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, 24 तासानंतर ही सोपान पालवे यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला नाही. जोपर्यंत या संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम चव्हाण तसेच मुख्याध्यापक आणि संबंधितांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबियांकडून घेण्यात आला आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.