मुंबई: लोकराज्य जुलै-ऑगस्ट 2024 अंकाचे आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह यांची उपस्थिती होती या अंकामध्ये शासनाच्या दोन वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांचा समग्र आढावा घेण्यात आला आहे. या अंकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळातील सदस्यांचे मनोगत पर लेखांचा समावेश करण्यात आला आहे. या अंकामध्ये शासनाने आतापर्यंत घेतलेला निर्णय यांचा थोडक्यात आढावा घेण्यात आला आहे. तसेच या अंकामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचा आढावा आणि महिला लाभार्थ्यांच्या प्रतिक्रियांचा समावेश करण्यात आला आहे. विविध विभागांच्या निर्णयांचा या अंकात समावेश असल्याबद्दल मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.