Entertainmentक्राईम न्युजताज्या घडामोडीफिल्मी दुनियामहाराष्ट्रसंपादकीय

दोन करोड रुपये खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, आणि विष्णू चाटे वर केज पोलिसात गुन्हा दाखल.

पाठलाग न्यूज / क्राइम प्रतिनिधी :

दोन करोड रुपये खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, आणि विष्णू चाटे वर केज पोलिसात गुन्हा दाखल.

बीड — धनंजय मुंडेंचे सारथी वाल्मिक आण्णा कराड यांच्यासह राष्ट्रवादीच्या दादा गटाचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे व सुदर्शन घुले यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या तिघांवर मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटीच्या खंडणीसाठी धमकावत असल्याची तक्रार केली असून, संबंधित अधिकाऱ्यांचं अपहरण करून दोन कोटी रुपयाची खंडणी प्राप्त करण्यासाठी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची तक्रार अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केज पोलीस ठाण्यात दिली आहे. अवादा या पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याने तशी फिर्याद दिल्यामुळे केज पोलिसांनी परळी वैजनाथ येथील सर्वश्रुत वाल्मिक कराड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांवर दोन कोटीची खंडणी मागितली आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, केज तालुक्यातील मस्साजोग येथील अवादा या पवन ऊर्जा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनिल केदु शिंदे रा. नाशिक ह.मु. मोंढा रोड बीड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मागील एक वर्षापासून ते अवादा एनर्जी प्राव्हेट लिमीटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहे. त्यांच्याकडे बीड जिल्हयातील केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवन उर्जा प्रकल्पाची मांडणी आणि उभारणीचं काम आहे. मस्साजोग या ठिकाणी प्रकल्पाचे मुख्य कार्यालय असून, त्या ठिकाणी विविध प्रकल्पाचे अधिकारी काम पाहत आहेत. २९ नोव्हेंबर रोजी मस्साजोग येथील अवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना सुनिल शिंदे यांच्या फोनवर विष्णू चाटे याने फोन केला आणि त्यांनी मला वाल्मीक आण्णा बोलणार आहेत असे म्हणाले, ते काम बंद करा, ज्या परिस्थीतीमध्ये सुदर्शनने सांगितले आहे, त्या परिस्थीतीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, काम चालू केलं तर याद राखा असं म्हणून प्रकल्पाचं काम बंद करण्याबाबत धमकी दिली. कार्यालयात हजर असताना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुदर्शन घुले, रा. टाकळी हा मस्साजोग येथील प्रकल्पाच्या ठिकाणी आला आणि त्याने पुन्हा काम बंद करा, अन्यथा जी मागणी यापूर्वी केलेली आहे त्याची पुर्तता करा, असं म्हणून केजमध्ये चालू असलेल्या इतर ठिकाणाचे अवादा कंपनीचे सर्व काम बंद करा, अन्यथा तुमचे हात-पाय तोडून तुमची कायमची वाट लावून टाकेन, असं म्हणत धमकी दिली होती. काही दिवसांपूर्वी शिवाजी थोपटे यांना वाल्मीक आण्णा कराड यांनी त्यांचे परळी येथील कार्यालयात बोलावून अवादा कंपनीचे केज तालुक्यातील सर्व काम बंद करा अन्यथा काम चालू ठेवायचं, असेल तर दोन करोड रुपये द्या असं सांगितलं होतं. त्यानंतर वेळोवेळी विविध लोकांच्या मोबाईलवरुन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचं काम बंद न ठेवल्यास सांगितलं. तसंच मारहाण करण्याच्या आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. यापूर्वी २८ मे २०२४ रोजी ११ वाजता याच कारणावरुन आपलं आपहरण केल्याचं सुनिल शिंदे यांनी सांगितलं. त्याबाबत पोलीस ठाणे केज येथे तक्रार दिल्याचंही ते म्हणाले. त्यानंतर ६ डिसेंबर २०२४ रोजी देखील सुदर्शन घुले आणि इतरांनी आवादा कंपनीचे मस्साजोग येथील प्रकल्पाच्या ठिकाणी जबरदस्तीने प्रवेश करुन गेटवरील कामगारांना धमकी देऊन मारहाण केली होती. त्यावेळी कंपनीचे शिवाजी थोपटे यांनी सुदर्शन घुले आणि इतर लोकांविरुध्द पोलीस ठाणे केज येथे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झालेला आहे. अवादा कपंनीचे केज तालुक्यातील पवन उर्जा प्रकल्पाचे काम बंद करण्यासाठी वाल्मीक कराड रा. परळी, विष्णु चाटे रा. कौडगाव ता. केज आणि सुदर्शन घुले रा. टाकळी ता. केज हे वारंवार प्रकल्पाचे काम चालु झाल्यापासुन धमकी देत आहेत. त्यामुळे त्यांच्या दहशतीखाली असल्याने, तसंच मनस्थिती बरी नसल्याने सुनिल केदु शिंदे त्यांनी कपंनीचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या सल्ल्याने बुधवारी तक्रार दाखल केली असल्याचे म्हटले आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये